

Three arrested in connection with youth's murder
गेवराई : पुढारी वृत्तसेवा : गंगावाडीत एका युवकास बेदम मारहाण केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील एकाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिवम काशिनाथ चिकणे (२१, रा. गंगावाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शिवम यास शुक्रवारी तलवाडा - गंगावाडी रस्त्यावर अडवून गावातील पाच जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बेशुद्ध शिवमला पाहताच मारहाण करणारे पाच ही जणांनी येथून पळ काढला. वेशुद्ध आवस्थेतील शिवमला गावातील काही नागरिकांनी पाहताच चुलते भास्कर चिकणे यांना फोन करून माहीती दिली.
यावरून त्यांनी घटनास्थळावर धाव घेत गंभीर झालेल्या शिवमला तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्याची परिस्थिती पाहताच डॉक्टर यांनी गेवराई येथे हलविण्यात सांगीतले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याचा सल्ला दिला.
परंतू उपचार सुरु असतानाच शनिवारी शिवम चिकणे याचा मृत्यू झाल्याने गंगावाडी गावात तणावाची स्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने गेवराईचे पोलिस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू, तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, फौजदार स्वप्नील कोळी दाखल झाले. फरारी आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिस पथके आरोपीच्या शोधात रवाना करण्यात येतील.
दरम्यान, रविवारी पाच आरोपी पैकी गणेश सुखदेव यादव, शिवम गणेश यादव आणि राजाभाऊ उत्तम यादव या तिघांना पोलिसांनी अटक केली असून यातील गणेश यादव यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, फरारी सत्यम छगन मांगले आणि ईश्वर गोवर्धन यादव यांच्या शोधात पोलीस पथक रवाना केले असल्याची माहीती तलवाडा पोलीसांनी दिली.
शिवम चिकणे याच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी आक्रमक ठाण्यासमोर आणत आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भूमिका घेतली होती.