Parli news: खेळायला गेलेली मुलगी रडतच घरी परतली; मंदिराच्या आडबाजूला लैंगिक अत्याचार, परळी हादरली! नेमकं काय घडलं?

खेळताना एका आडबाजूला नेऊन १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली आहे.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Parli news

परळी वैजनाथ: खेळताना एका आडबाजूला नेऊन १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून परळी पोलिसांनी गावातीलच एका २७ वर्षीय तरुणावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली आहे. आकाश भरत नागरगोजे (वय २७, रा. जिरेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी गावातील मारुती मंदिर परिसरात खेळण्यासाठी गेली होती. मात्र, बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी मंदिर परिसर, गाव आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून आली नाही.

Crime News
High Court: रात्री घरात घुसणे, महिलेचे कपडे वर करणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नव्हे: उच्च न्यायालय

काही वेळानंतर पीडित मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत रडत घरी पोहोचली. आरोपी आकाश याने खेळत असताना तिला फूस लावून आडबाजूला नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तिने रडत-रडत कुटुंबीयांना सांगितले.

पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

घडलेला गंभीर प्रकार समजताच मुलीच्या आईने थेट परळी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी आकाश नागरगोजे याच्याविरुद्ध 'पोक्सो' कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Crime News
Parli Shravan Mahotsav: परळीत शासनाचा ‘श्रावण महोत्सव’ रसिकांविनाच; दर्जेदार कार्यक्रमाचा प्रसिद्धीअभावी फज्जा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news