Jalna Dam Water Storage : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्याची स्थिती चिंताजनक

७ मध्यम प्रकल्पांत ७ टक्के तर ६० लघु प्रकल्पांत केवळ ४ टक्केच पाणी साठा
Jalna Dam Water Storage
Jalna Dam Water Storagepudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : जालना जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच लघु व मध्यम प्रकल्पांनी तळ गाठल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.लघु पाटबंधारे विभागाच्या २३ नोव्हेंबरच्या अहवालानुसार ७ मध्यम प्रकल्पांत ७.०८ टक्के तर ६० लघु प्रकल्पांत ४.७८ टक्के पाणी साठा असल्याने आगामी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईचे चटके जिल्हावासीयांना जाणवणार आहे.

जालना जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६०५ मिमी असताना जिल्ह्यात ४५० मिमी पाऊस पडला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ६५ टक्के एवढा आहे. त्यातही पावसाळ्यात मोठे पाऊस न पडल्याने नदी, नाल्यांना पूर आला नसल्याने लघु व मध्यम प्रकल्पांतील पाणी पातळीत वाढ झाली नाही.

Jalna Dam Water Storage
Chhatrapati Sambhajinagar News : कन्नड तालुक्यात दुष्काळाचा यंदा रब्बी हंगामाला फटका

सद्य:स्थिती ७ मध्यम तलावांमध्ये ४.६६ दलघमी (७.०८ टक्के) तर ६० लघु तलावांमध्ये ८.६७ दलघमी (४.७८ टक्के) टक्के साठा उपलब्ध आहे. अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प कोरडा पडला असून भोकरदन तालुक्यातील धामणा व जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पाची पातळी जोत्याखाली गेली आहे. ६७ लघु व मध्यम प्रकल्पांपैकी १८ तलाव कोराडे पडले असून ३३ तलावांतील पाणी पातळी जोत्याखाली आहे.

जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्पात १.९६ दलघमी (२०.२७ टक्के) , कल्याण मध्यममध्ये २.५७ दलघमी (२०.७९ टक्के) आणि बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ०.१२ दलघमी (०.९६ टक्के) साठा झाला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत हा साठा कमी झाला आहे. मागील वर्षी अप्पर दुधना, जिवरेखा हे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले होते. यंदा परिस्थिती भीषण आहे.

Jalna Dam Water Storage
Jalna Crime : किराणा दुकान फोडून लाखाचा ऐवज लंपास; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

जिल्ह्यात जवळपास दीडशे टॅँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरविले जात आहे. जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा, कल्याण मध्यम, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना, भोकरदन तालुक्यातील धामना, जुई, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ७.०८ टक्के पाणी आहे.

असा आहे पाणी साठा

जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्पात १.९६ दलघमी (२०.२७ टक्के), कल्याण मध्यम प्रकल्पात २.५७ दलघमी (२०.७९ टक्के), बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ०.१२ दलघमी (०.९६ टक्के) पाणी आहे. भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात ०.०४ दलघमी (०.०४ टक्के), धामना प्रकल्प, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पाची पातळी जोत्याखाली गेली आहे. अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प कोरडे पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.