

माजलगाव : माजलगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी अखेर आज नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या आरक्षणामुळे उमेदवारांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आणि तणाव आता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान माजलगाव शहरातील १३ प्रभागातील २६ नगरसेवकात १६ नगरसेवक सर्वसाधारण प्रवर्गातील असणार आहेत.७ नगरसेवक ओबीसी प्रवर्गातील असणार आहेत तर ३ नगरसेवक एससी प्रवर्गातील आहेत.
प्रभाग १-अ मध्ये ओबीसी महिला, ब-(सामान्य) खुला असणार आहे.
प्रभाग २- अ-अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण.
प्रभाग-३ अ-ओबीसी पुरुष, ब- सर्वसाधारण महिला.
प्रभाग-४ अ-ओबीसी पुरुष, ब- सर्वसाधारण महिला.
प्रभाग-५-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण (सामान्य),
प्रभाग-६-अ- सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण (खुला)
प्रभाग-७-अ-ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण(खुला)
प्रभाग-७-अ-ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण(खुला)
प्रभाग-९-अ-ओबीसी पुरुष, ब-सर्वसाधारण महिला.
प्रभाग-१०-अ- सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण(खुला).
प्रभाग-११-अ-ओबीसी महिला, ब-सर्वसाधारण(खुला).
प्रभाग-१२-अ-एससी महिला, ब- सर्वसाधारण(खुला)
प्रभाग-१३-अ- एससी पुरुष, ब-सर्वसाधारण महिला.
अशा पद्धतीने माजलगाव शहरातील १३ प्रभागातील २६ नगरसेवकांचे आरक्षण लहान मुलांच्या हस्ते चिट्टी काढून जाहीर करण्यात आले. ही प्रक्रिया आ. प्रकाश सोळके यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी तहसीलदार संतोष रुईकर, मुख्याधिकारी पोपट निगळ, अभियंता मारुती गित्ते, vचव्हाण यांनी राबवली आहेत. यावेळी भावी नगरसेवकांसह इच्छुकांची मोठी गर्दी होती. या आरक्षणामुळे माजलगावच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत, तर नव्या चेहऱ्यांना राजकारणात प्रवेशाची मोठी संधी मिळाली आहे.
शहरातील सर्वच पक्षांनी यानंतर आपल्या उमेदवारांच्या याद्या नव्याने तयार करण्याचे काम सुरू केले असून, पुढील काही दिवसांत माजलगावच्या राजकारणात नव्या गठबंधनांची आणि तुटणाऱ्या समीकरणांची नवी नाट्यपर्दा उघडण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान माजलगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष ओबीसी महिला विराजमान होणार आहे.तर २६ नगरसेवकातून १३ महिला नगरसेविका असणार आहेत. या समीकरणातून माजलगाव नगर परिषदेत यंदा महिलाराज दिसणार आहे.