

Nine gates of Majalgaon Dam opened
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : मागील आठ दिवसात माजलगाव धरण क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने शुक्रवारी संध्याकाळी धरण ९६ टक्के भरल्याने धरणातून तीन दरवाज्याद्वारे पाणी सोडण्यात आले होते परंतु शनिवारी सकाळी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने अकरा ११ वाजता सात दरव-ाजाद्वारे १४ हजार क्युसेस पाणी नऊ नऊ दरवाजाद्वारे सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात आले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी या धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील आठ दिवसापासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मागील चार दिवसात धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी दहा वाजता हे धरण ९६ टक्के भरले होते. त्यामुळे सिंदफणा नदी पात्रात तीन दरवाजा द्वारे पाणी सोडण्यात आले होते.
वरून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने सकाळी अकरा वाजता सात दरवाज्याद्वारे १४ हजार क्युसेस एवढे पाणी सोडण्यात आले होते. दुपारी चार वाजता पाण्याची आवक वाढतच असल्याने चार वाजता ९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडुन त्याद्वारे १८ हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले. शनिवारी दुपारी हे धरण ४३१.७४ मीटर एवढे भरले होते. त्यामुळे पाण्याची पातळी ९८ टक्के एवढी झाली होती. दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सिंदफना नदी पात्रात शेजारी असलेल्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला होता.