माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदार संघात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेत ४ हजार ६४३ लाभार्थ्यांना मंजुरी दिली असल्याची माहिती माजलगाव विधानसभेचे भाग्यविधाते आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघवासियांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले आहे. माजलगाव विधानसभा मतदार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत वैयक्तिक घरकुल योजने मध्ये हजारो लाभार्थ्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते.
प्रस्तावास मंजुरी मिळण्याबाबत सातत्याने मंत्री अतुल सावे यांच्याकडे आ. सोळंके यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे माजलगाव मतदारसंघातील ४ हजार ६४३ लाभार्थ्यांच्या प्रस्तावास दि. ९ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभागचे मंत्री अतुल सावे यांचे आभार आ. प्रकाश सोळंके यांनी मानले.