

माजलगाव : माजलगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि अत्याचार याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिसऱ्यादिवशी याला वेगळेच वळण मिळाले असून पीडित मुलीने धैर्य दाखवत आपविती ही न्यायालय समोर मांडली त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे तर दुसरीकडे पोलिस यंत्रणा मात्र कानावर हात ठेवून नरो वा, कुंज रो वा म्हणताना दिसत आहे.
माजलगाव येथील एका अल्पवयीन मुलीला कॅफेमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना चार ते पाच दिवसांपूर्वी घडली होती. या तक्रारीवरून पोलिस तपास करत असताना या अनेक गोष्टी समोर आल्या. यात पीडितेने न्यायालयासमोर चक्क आपबिती सांगून मोठी खळबळच उडवून दिली. यावेळी तिने आपल्यावर अत्याचार करण्यात आला असून धर्मांतर करण्यासाठी सातत्याने दबाव टाकण्यात आला असल्याचे तिने सांगितले.
मुलीने हे सांगितल्यावर या घटनेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून अजून किती मुलीना या आरोपीने शिकार केले आहे याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. मात्र याबाबत आता पोलिस आधीकार्यातच संभ्रम निर्माण झाला असून हे प्रकरण खरोखरच तसे आहे का ? या बाबत शंका व्यक्त केली जात आहे.
माजलगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी काही समाजमाध्यमावर ते धर्मांतर करण्याच्या दबावातून कृत्य केले असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत, मात्र असा कोणताही प्रकार अथवा तसे पुरावे हे तपासात समोर आले नसून विनाकारण काही मंडळी हे करत आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे महेश भोसले सहायक निरीक्षक, पिंक पथक यांनी सांगितले आहे.