

Mahadev Munde case Dnyaneshwari Munde Chief Minister Devendra Fadnavis
परळी, पुढारी वृत्तसेवा : व्यापारी महादेव मुंडे प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून आता माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आता या प्रकरणातील आरोपींना एसपीनी तात्काळ अटक करावे अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलीय.
पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, महादेव मुंडेंच्या तपासाचा मुद्दा विधानसभेत गाजल्यानंतर त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. त्यावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रीया दिली.
मुख्यमंत्र्यांच्या तोंडून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही या उत्तरावर मी समाधानी आहे. मी जे टोकाचं पाऊल उचचलं त्यावर त्यांनी आपल्या राज्यातली महिला न्यायासाठी बेचैन असल्याचं पाहून त्यांनी निर्णय घेतला. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून आता माझ्या नवर्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आता या प्रकरणातील आरोपींना एसपीनी तात्काळ अटक करावे अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलीय. या प्रकरणात जे न्याय करणारे ते मुख्यमंत्रीच करणार आहेत. या प्रकरणात मी वारंवार परळी पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांचे सीडीआर मागत असल्याचा पुनरुच्चार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला.
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाला १६ महिने उलटून गेले, तरीही आरोपी मोकाटच आहेत. पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला आहे.
खुल्या मैदानात हल्ला झाला, त्यामुळं साक्षीदार सापडला नाही. एक महिला दीड महिन्यांनी पुढे आल्याचे फडणवीस म्हणाले. डम डाटा आपण तपासत आहोत. महादेव मुंडे यांच्या पत्नीचा आक्रोश मी समजू शकतो. याप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.