बीड : सोयाबीन कापणीसाठी आलेला मजूर निघाला घरफोड्या

१ लाख ८७ हजार घेऊन दोन साथिदारांसह पसार
Beed theft case
सोयाबीन कापणीसाठी आलेल्या मजुराने चोरी केली Pudhai File Photo
Published on
Updated on

केज : शेतात सोयाबीनची कापणी करण्यासाठी आलेल्या एका मजुराने त्याच्या दोन साथीदाराच्या साहाय्याने मालकाच्या घरातील कपाट फोडून दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (दि.१३) रात्री ११.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी मस्जीद बशीर शेख याच्यासह त्याच्या दोन साथिदारांवर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed theft case
जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक; दुचाकीसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त

याबाबतची माहिती अशी, केज तालुक्यातील आगेवाडी येथील भीमराव भगवान आघाव हे त्यांच्या शेतात राहतात. त्यांच्या शेतात मजुरांकडून सोयाबीनची कापणी सुरू आहे. रविवारी (दि.१३) रात्री ११:०० च्या सुमारास भीमराव आघाव आणि त्यांचे कुटुंबीय हे जेवण करून घरात झोपले असताना सोयाबीन कापणीसाठी आलेला मजूर मस्जीद बशीर शेख याने दोन साथिदारांच्या साहाय्याने कपाट फोडून १ लाख ८७ हजाराचा ऐवज घेऊन पसार झाला. त्यानंतर आघाव यांनी त्याचा पाठलाग केला असता दुचाकी खड्ड्यात गेल्याने ते दुचाकी सोडून पळून गेले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Beed theft case
वाशीम : विद्युत तार चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news