वाशीम : विद्युत तार चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
washim
वाशीम : विद्युत तार चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यातPudhari Photo
Published on
Updated on

वाशीम पुढारी वृत्तसेवा : वाशिम ग्रामिण हद्दितील आडोळी ते वाळकी मांझरे एकुण ३५ पोल वरिल १८० मिटर विद्युत तार चोरीस गेली. अप क ३५५/२४ कलम १३६ भारतीय विद्युत अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

सापळा रचत चौघांना ताब्यात

सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना गोपनिय माहिती आरोपी बाबत माहिती मिळाली की, गुरुवारी (दि.५) चोरी केलेली अल्युमिनीयम तार बोलेरो पिकअप मधून वाशिम येथुन बाहेर गावी घेवून जात आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सापळा रचत सदरचे वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी शेख हक्कीम शेख मुनाफ (वय. ४०, रा. घरकुल, जि. वाशिम), हिवरखेड येथील रहिवासी (ता. खामगाव जि. बुलढाणा) दशदथ अशोक अडागळे (वय. ३६), विजय बंडु बघे (वय. २६) आणि विक्रांत प्रशांत वाकोडे (वय. २४) यांना ताब्यात घेतले.

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चौकशीत स्पष्ट झाले आहे की, या प्रकरणातील संशयितांनी वाशिम जिल्हात वाशिम शहर, वाशिम ग्रामिण, मंगरूळपीर आणि कारंजा ग्रामिणच्या हद्दित विद्युत अल्युमिनीयम तार चोरी केल्या. या चौघांकडून तीन लाख किमंतीची तार, तीन लाख किमतीचे वाहन असे एकुण ६ लाख रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यावाही कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे. अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश धोत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कंकाळ, दिपक सोनोने, अशिष बिडवे, नापोकों ज्ञानदेव मात्रे, प्रविण राउत पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल महले, दिपक घुगे,अमोल इरतकर, अविनाश वाढे, चालक गजानन जाधव, संदिप डाखोरे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने पार पाडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news