Gardabh Swari festival Kej : ब्रेकनंतर पुन्हा रंगणार गर्दभ स्वारी; जावयांच्या शोधात तरुणांची धावपळ

कोरोना आणि सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे दीडशे वर्षांच्या परंपरेला दोनदा खंड
Gardabh Swari festival Kej
ब्रेकनंतर पुन्हा रंगणार गर्दभ स्वारी; जावयांच्या शोधात तरुणांची धावपळpudhari photo
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : गावचा जावई म्हणजे साऱ्या गावाचा लाडका-मानमरातब, पाहुणचार आणि तळहातावर घेतलेली सरबराई! पण केज तालुक्यातील विडा येथे धुळवडीच्या दिवशी चित्र अगदी उलटं असतं. येथे जावयाला चक्क चपलांचा हार घालून गाढवावर बसवले जाते आणि डीजेच्या तालावर गावभर मिरवणूक काढली जाते. गंमत, खोडकरपणा आणि परंपरेचा संगम असलेली ही ‌‘गर्दभ स्वारी‌’ पुन्हा एकदा रंगणार असून जावयांच्या शोधात तरुणांची पथके रवाना झाली आहेत.

विडा हे निजामशाहीतील जहागीरदार यांचे गाव. सुमारे 90 ते 150 वर्षांपूर्वीची ही कथा सांगितली जाते. अंदाजे सन 1915 च्या सुमारास जहागीरदार घराण्यातील आनंदराव देशमुख यांच्या मेहुण्यांची धुळवडीला सासरी आगमन झाले. थट्टा-मस्करीत त्यांची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली आणि तीच घटना पुढे गावाची परंपरा ठरली.

Gardabh Swari festival Kej
Dharashiv Accident: दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

आजही धुळवडीच्या दिवशी जावई ना-नु करत असला तरी अखेर गावकऱ्यांच्या प्रेमळ हट्टापुढे मान तुकवून आणि गाढवावर आरूढ होतो. डीजेच्या ठेक्यावर तरुणाई नाचते, गावकरी टाळ्या पिटतात आणि जावयाची ‌‘गर्दभ स्वारी‌’ जल्लोषात पार पडते.

सन 2021 मधील कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे या परंपरेला पहिला खंड पडला. त्यानंतर 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विडा ग्रामस्थांनी देशमुख कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत मागील वर्षी दुसऱ्यांदा गर्दभ स्वारी स्थगित केली.

Gardabh Swari festival Kej
Harbhara harvesting expense : हरभरा सोंगणीला चार हजार रुपये खर्च

यंदा मात्र ग्रामस्थांनी परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला आहे.यंदा ब्रेकनंतर पुन्हा रंगणाऱ्या गर्दभ स्वारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावात डीजेचे सूर, तरुणांची लगबग आणि जावयांची धाकधूक-अशा रंगतदार वातावरणात विडा पुन्हा एकदा परंपरेचा जल्लोष अनुभवणार आहे.

जावयांच्या शोधात पथके

परंपरा जपण्यासाठी तरुणांची शोध पथके आधीच सज्ज झाली आहेत. जावई सापडल्याशिवाय परतायचे नाही, असा चंग तरुणांनी बांधला आहे. परिणामी काही जावई ‌‘भूमिगत‌’ झाले, तर काहींनी मुक्काम बदलल्याची चर्चा रंगली आहे.

परंपरेचा उत्साह, जावयाची धाकधूक

गावकऱ्यांसाठी ही परंपरा केवळ गंमत नाही, तर एकत्र येण्याचा आणि हास्य-खेळाचा सण आहे. जावयांसाठी मात्र हा दिवस ‌‘सन्मान की सजा‌’ अशी द्विधा मन:स्थिती निर्माण करणारा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news