Dharashiv Accident: दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Accident  News
Accident News File Photo
Published on
Updated on

मुरुम : मुरुम पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी सौ. प्रियंका किरण कांबळे (वय 29, रा. दाळींब ता. उमरगा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्या व गुणाबाई बाबु मदने उर्फ पाटील (वय 56, रा. मदनेवाडी ता. बसवकल्याण जि. बिदर) या देविदास देवकत्ते यांच्या घरासमोर सर्व्हिस रोडवरून पायी जात असताना मोटारसायकल (एमएच-बीबी-8874) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून पाठीमागून धडक दिली.

Accident  News
Hurda party in Jamkhed : जामखेड शेतात रंगताहेत हुरडा पार्टी

या अपघातात गुणाबाई मदने पाटील या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर फिर्यादी प्रियंका कांबळे या किरकोळ जखमी झाल्या. या प्रकरणी दि. 1 मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Accident  News
Chatrapati Sambhajinagar Accident : जीपची दुचाकीला धडक; निल्लोड येथील तरुण ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news