Kej Bus Stand Theft | केज बस स्थानकावर दागिन्यांची चोरी; गंगाखेडमधून संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Kej Bus Stand Theft | दरम्यान अश्विनी घोळवे यांनी दिलेल्या माहिती वरून दि. ७ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातून एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.
beed case
beed case
Published on
Updated on

गौतम बचुटे/केज

भावाच्या लग्नाच्या निमित्ताने माहेरी जात असलेल्या एका विवाहित महिलेच्या पर्स मधून केज च्या बस स्टँडवर ३ लाख ३५ हजार रु. चे सोन्याचे दागिने चोरीला गेलेल्या घटनेतील स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथून ताब्यात घेतले आहे.

beed case
Beed Crime News : कारचालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले

दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:४५ वाजण्याचे सुमारास केज येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहत असलेल्या अश्विनी गोविंद घोळवे या त्यांच्या भावाच्या लग्नाच्या कार्यक्रमा निमित्त लातूर येथे त्यांच्या माहेरी जात असताना त्या नाशिक-लातूर या बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्सची चैन उघडून पर्स मध्ये ठेवलेले १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मोठे पट्टीचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, असे एकूण ३ लाख ३५ हजार ९८० रु. किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.

beed case
Beed News | मांजरा धरणाच्या रॅम्पला गळफास घेऊन धारुर आगाराच्या चालकाने संपवले जीवन

दरम्यान अश्विनी घोळवे यांनी दिलेल्या माहिती वरून दि. ७ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातून एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी अश्विनी घोळवे यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ५१/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news