Beed News | मांजरा धरणाच्या रॅम्पला गळफास घेऊन धारुर आगाराच्या चालकाने संपवले जीवन

घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट नाही, युसुफवडगाव पोलिस ठाण्यात नोंद
Beed News | मांजरा धरणाच्या रॅम्पला गळफास घेऊन धारुर आगाराच्या चालकाने संपवले जीवन
Published on
Updated on

केज :- धारूर आगारात एसटी बस चे चालक म्हणून कार्यरत असलेल्या एका वाहकाने केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या रॅम्पच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील धनेगाव येथील रहिवाशी असलेले आत्मलिंग नामदेव गुजर वय ( वर्ष ) यांनी दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास धनेगाव येथील मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या रॅम्प च्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत आत्मलिंग गुजर यांचे चुलत भाऊ विश्वनाथ रामलिंग गुजर यांच्या फिर्यादी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात अकास्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार डोंगरे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news