Beed News : विनयभंग प्रकरणात डॉक्टरला अटक करा

कडा येथील ग्रामस्थ आक्रमक; पोलिस प्रशासनास दिले निवेदन
Doctor misconduct case
Doctor misconduct casepudhari photo
Published on
Updated on

कडा : कडा येथील तरुणीने डॉक्टरवर गैरवर्तनाचा गंभीर आरोप केल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगून अटकेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी एपीआयंकडे निवेदन देत आरोपीवर कोणतीही दिरंगाई न करता कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तरुणीने केलेल्या गंभीर आरोपानंतर कडा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान,आरोपी रुग्णालयात उपचार घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला अटक होऊ नये यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.

Doctor misconduct case
Beed farmers rainfall crisis : माजलगाव तालुक्याकडे पावसाची पाठ

गंभीर आरोप असलेल्या प्रकरणात तपासाची दिशा आणि पोलिसांकडून होणारी कारवाई याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.आरोपीची वैद्यकीय स्थिती, उपचाराची आवश्यकता आणि त्यासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Doctor misconduct case
Sanjay Lakhe Patil : मंत्री विखे पाटील मराठा समाजाला भूलविण्याचे काम करताहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news