August Festival 2025: ऑगस्ट महिन्यात तब्बल 13 सण- महोत्सव, वाचा यादी
जवळा बाजार (बीड) : अनिल पोरवाल
येत्या ऑगस्ट महिन्यात जवळपास १३ सणांची व विविध महोत्सवाची मेजवानी मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात श्रावण सुरू होणार आहे. श्रावण महिन्यात मोठ्याप्रमाणात भाविक राज्यातील नव्हे तर इतर राज्यातील धार्मिकस्थळी दर्शनासाठी जातात.
श्रावण सोमवारी भाविक भक्त मोठ्याप्रमाणात उपवास, व्रत करतात व सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. ऑगस्ट महिन्यात विविध सण व महोत्सव एकत्र आले आहेत.
८ ऑगस्ट- नारळी पौर्णिमा हा सण राज्यातच नव्हे तर इतर राज्यात मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात येत असतो.
९ ऑगस्ट- भाऊ बहीण सण रक्षाबंधन घरोघरी मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात येतअसतो.
१४ ऑगस्ट- पतेती
१५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन ठिकठिकाणी ध्वजारोहण व विविध संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. याच दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव देखील असून हा उत्सवही मोठ्या उत्साहात भाविक भक्त साजरा करतात.
१६ ऑगस्ट- गोपाल काला दहीहंडी - मोठ्याप्रमाणात साजरी करण्यात येत असते.
२२ ऑगस्ट - पोळा. बळीराजाचा सण. या दिवशी बैल जोडी सजावट करून मिरवणूक काढण्यातयेत असते बैलजोडी पुजा व पुरणपोळी नैवेद्य बैल जोडीस दाखवतात.
२६ ऑगस्ट- महिलांचा हरितालीका सण घरोघरी साजरा करण्यात येत असतो.
२७ ऑगस्ट - बालगोपाल पासून तरूण वर्ग महिला सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात त्या गणरायाचा आगमनाचा दिवस म्हणजे गणेश चतुर्थी. या दिवशी मोठ्या उत्साहात घरोघरी गणरायाची स्थापना करण्यात येत असते तर बालगणेश व सार्वजनिक गणेश मंडळीकडून गणेशोत्सव देशात मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात येत असतो सलग दहा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न होतो विविध संस्कृतीक व धार्मिक आणि विविध कलागुणास प्रोत्साहन देणारा स्पर्धा आणि मनोरंजन कार्यक्रम रेलचेल सलग दहा दिवस चालते.
२८ ऑगस्ट- ऋषिपंचमी व जैन समाज बांधवांचा पर्युषण पर्व सुरुवात होते सलग दहा दिवस मंदिरात पुजा अभिषेक आरती व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.
३१ ऑगस्ट- रोजी ज्येष्ठ गौरी आगमन होणार असून घरोघरी ज्येष्ठ गौरीचे आगमन होते व पुजा आणि सलग तीन दिवस ज्येष्ठ गौरी सण साजरा होत असतो.

