बीडमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी मुळूकांची चर्चा

नाईकवाडेही स्पर्धेत; अंतिम निर्णय दादांचाच !
Beed Political News
बीडमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी मुळूकांची चर्चाFile Photo
Published on
Updated on

In Beed, Muluk's name is being discussed for the post of Deputy Mayor

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फ डकल्यानंतर आता उपनगराध्यक्ष पदासह सभापतीपदांसाठी रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी विनोद मुळूक यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे अमर नाईकवाडे हे देखील स्पर्धेत आहेत. याबरोबरच इतर काहीजण दबक्या आवाजात आपली दावेदारी सांगत असले तरी अंतिम निर्णय पालकमंत्री अजित पवारच घेणार आहेत.

Beed Political News
Beed Crime | केज तालुक्यात जमीन विक्रीस नकार दिल्याने वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला

बीड नगरपालिकेत यावेळी आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्व ाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. त्यानंतर आता उपनगराध्यक्षपदासह सभापतीपदासाठी फि ल्डींग लावणे सुरु झाले आहे. दरम्यानच्या काळात उपनगराध्यक्षपदाचे दावेदार फारुक पटेल यांची गटनेतेपदी निवड झाल्याने आता इतर ज्येष्ठ नगरसेवकांची नावे उपनगराध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत.

हीच नाराजी नगराध्यक्षपदाच्या पदग्रहण समारंभात दिसून आली होती. आता जरी पटेल यांच्याकडून माझा तसा काही उद्देश नव्हता असे सांगितले जात असले तरी 'बुंद से गयी वो हौद से नही आती' अशी चर्चा होत आहे. दरम्यान, आता सामाजिक समतोल साधण्यासाठी राष्ट्रवादीकडून विनोद मुळूक यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी सर्वात पुढे आहे.

Beed Political News
मौका सभी को मिलता है... आ. धनंजय मुंडेंचा विरोधकांना सूचक इशारा

याबरोबरच नगरपालिकेतील अभ्यासू व लढाऊ नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या अमर नाईकवाडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. या दोघांशिवाय इतर काही नगरसेवकही आपली दावेदारी सांगत असून त्यासाठी 'शिवछत्र 'वर लॉबींग केली जात आहे. दरम्यान, आता आणि उपनगराध्यक्षपद सभापतीपदासाठी इच्छुकांची नावे पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहचणार असून तेच अंतिम नावावर शिक्कामोर्तब करतील अशी देखील माहिती आहे.

दरम्यान मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडून देखील उपनगराध्यक्ष पदावर दावा सांगितला जात आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी नगराध्यक्ष पदग्रहन सोहळ्यात आगामी काळातील युती बाबत विचार करावा लागेल असे म्हणत सुचक इशारा देखील दिलेला आहे. यामुळे शिवसेनेला सोबत घेण्यासाठी म्हणून शिवसेना नगरसेवकांची निवड केली जाण्याचा संभव आहे. या राजकीय परिस्थितीमुळे वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news