मौका सभी को मिलता है... आ. धनंजय मुंडेंचा विरोधकांना सूचक इशारा

इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती नागरगोजे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिक्षण महर्षी गौतमराव बाप् नागरगोजे व शिवशला माई नागरगोजे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यात ते बोलत होते.
आ. धनंजय मुंडे
मौका सभी को मिलता है... आ. धनंजय मुंडेंचा विरोधकांना सूचक इशाराFile Photo
Published on
Updated on

MLA Dhananjay Munde gives warning to the opposition

परळी, पुढारी वृत्तसेवा :

सर्वाधिक मतांनी निवडून येऊन देखील मला किती संघर्ष करावा लागतोय, हे तुम्हाला दिसतच आहे. वंचित घटकातील किंचितसा माणूस पुढे चालला तर त्याला मागे खेचण्यासाठी अनेकजण टपून बसलेले असतात.

आ. धनंजय मुंडे
Beed Crime | इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा, लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर बलात्‍कार!

परंतु, आता उगाच काही करू नका, शांत रहा.. कारण मोका सभी को मिलता हैफ अशा फिल्मी पण सूचक शब्दांत आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या विरोधकांना इशारा दिला. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती नागरगोजे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिक्षण महर्षी गौतमराव बाप् नागरगोजे व शिवशला माई नागरगोजे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे विविध सामाजिक उपक्रम व शैक्षणिक स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले.

यावेळी बोलताना आ. मुंडे यांनी विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, मागील वर्षी मी कृषिमंत्री असताना अनेकांचा विरोध पत्करून धर्मापुरी येथे सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अधिक उत्पादन क्षमतेचे बियाणे तयार करण्यापासून ते सोयाबीनवर प्रक्रिया करून विविध उत्पादनांना भाव मिळवून देण्यापर्यंत शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी पूर्वी मंजूर केलेल्या निधीमध्ये आणखी वाढ करून वाढीव प्रशासकीय मान्यता लवकरच प्रदान केली जाईल आणि कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल.

आ. धनंजय मुंडे
Beed Crime | केज तालुक्यात जमीन विक्रीस नकार दिल्याने वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला

विद्यार्थ्यांना लक्षात राहिला रहैमान डकैत !

आ. धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विचारले, तुम्ही कोणता हिंदी चित्रपट पाहिला? त्यावर विद्यार्थ्यांनी मधुरंधरफ असे नाव सांगितले. मुंडेंनी यात नायक कोण? असे विचारताच विद्यार्थ्यांनी हिरोऐवजी रहैमान डकैत (अक्षय खन्ना) या व्यक्तिरेखेचे नाव घेतले. यावर हात जोडत मुंडे म्हणाले, चित्रपटांतून खलनायकाचे उदात्तीकरण होत असल्याने मुलांच्या मनावर त्याचे परिणाम होत आहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news