Beed Water Crisis : गाढेवाडीच्या पाण्यावर डल्ला

अनधिकृत कनेक्शनमुळे गावावर पाणीटंचाईचे संकट
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

गेवराई : जलजीवन मिशन अंतर्गत गाढेवाडी ग्रामस्थांसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनला अनधिकृत कनेक्शन घेऊन। मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पाणी चोरीमुळे गावात सध्या ग्रामस्थांनी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे गाढेवाडी ग्रामस्थांनी सांगितले आहे.

Water Crisis
Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

खडकी-कोळगाव येथील तलावात जलजीवन मिशन योजनेद्वारे विहिरीचे काम झालेले आहे. दरम्यान येथून गाढेवाडी गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र कोळगाव येथील करांडे वस्तीनजीक काही नागरिकांनी मुख्य पाईपलाईनला अनधिकृतपणे एक इंच व पाऊण इंच पाईपचे कनेक्शन घेऊन मागील काही दिवसांपासून पाण्याची चोरी सुरू केली आहे.

या कनेक्शनद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी स्वतःच्या खासगी विहिरीत सोडून शेतीसाठी वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे गाढेवाडी येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीत पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नसल्याने संपूर्ण गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने आधीच पाण्याची टंचाई निर्माण झाली असताना पाणी चोरीच्या प्रकारामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकाराची माहिती कोळगाव ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी देण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणी चोरीचे दिवसेंदिवस वाढत असून गावातील नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. या गंभीर प्रकरणाची तत्काळ चौकशी करून अनधिकृत कनेक्शन हटविण्यात यावेत तसेच गाढेवाडीचा पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली जात नसून ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

Water Crisis
Palghar Water Crisis : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही पाण्यासाठी वणवण

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

सदरील पाणी चोरी थांबवून गाढेवाडी येथील पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राजेंद्र गाढे, संभाजी गाढे, सोनाजी गाढे, कुंडलिक वावरे, राम देवकते, साथीराम महारगुडे आदींनी दिला असून तहसीलदार गेवराई, गटविकास अधिकारी, पंचायत समिती गेवराई तसेच सरपंच व ग्रामसेवक, ग्रामपंचायत कोळगाव यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news