

Illegal sand mining continues from the Godavari riverbed
सुभाष मुळे
गेवराई : गेवराई तालुक्यात वाळू माफियांचा दिवसेंदिवस थैमान वाढत असून गेवराई तहसीलदार संदीप खोमणे यांच्या आशीर्वादाने वाळू माफिया हे या परिसरात हैदोस घालत आहे. म्हाळस पिंपळगाव येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, नुकतीच महसूल पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १२ वाळूचे साठे जप्त करण्यात आले.
मात्र, सर्वसामान्यांचे डोळे विस्फारून टाकणारी बाब म्हणजे, गे-वराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही! या प्रकारामुळे तहसीलदारांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू जप्त होऊनही कायदेशीर तक्रार दाखल न करणे, ही केवळ हलगर्जीपणा नसून वाळूमाफियांच्या संरक्षणाची शक्यता यामागे लपलेली आहे, अशी जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.
गोदावरी पात्रातून अवैध उत्खननामुळे पर्यावरणावर दुरगामी परिणाम होत आहेत. एलपी, ट्रक, हायवा व टिप्परच्या सहाय्याने दिवसाढवळ्या वाळूची चोरी सुरू असून, शासनाच्या महसूलदेखील जमा होत नसून शासनाची पगार घेणारा तहसीलदार वाळूमाफियांसाठी उघड उघड काम करत असल्याचा आरोप गेवराईतील आहे. जनतेने केला आहे.
राक्षसभुवन, हिंगणगाव, सुरळेगाव येथे यापूर्वीही वाळू चोरीच्या घटनांत महसूल विभागाची ढिसाळ कारवाई स्पष्टपणे दिसली होती. कारवाईचे नाटक आणि आरोपींचे मोकाट सोडणे, हेच सूत्र कायम असल्याचे जनतेचे निरीक्षण आहे.
दरम्यान एका पाठोपाठ एक गाव अवैध उत्खननाच्या छायेत जात असताना तहसीलदार खोमणे यांच्या निष्क्रिय व संशयास्पद भूमिकेमुळे महसूल प्रशासनाची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन झाली आहे. गेवराई तालुक्यातील वाळू माफियांना अभय देणारे प्रशासन तातडीने बदलावे, अन्यथा जनआंदोलनाच्या तयारीत आहोत, असा इशारा आता नागरिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी दिला आहे.
नागरिकांचा इशारा
१२ वाळू साठे जप्त करूनही FIR नाही? मग ही कारवाई खरोखर माफियांविरुद्ध होती की नुसती दाखवायची होती? असा सवाल आता जनतेतून मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे.