Beed Crime : केजमध्ये एक कोटीचा गुटखा जप्त, शेतात लपलेल्या आरोपीला पाठलाग करून पकडले

शिताफीने केलेल्या या कारवाईने गुटखामाफियांना चांगलाच झटका बसला आहे.
Beed Crime News
Beed Crime : केजमध्ये एक कोटीचा गुटखा जप्त, शेतात लपलेल्या आरोपीला पाठलाग करून पकडले File Photo
Published on
Updated on

Gutkha worth Rs 1 crore seized in cage, accused caught hiding in field

केज, पुढारी वृत्तसेवा केज पोलिसांनी फिल्मी थराराला साजेशी धाडसी कारवाई करत मध्यप्रदेशातून गुटखा घेऊन कळंबकडे निघालेल्या ट्रकचा पाठलाग करून सुमारे १ कोटी १ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. शिताफीने केलेल्या या कारवाईने गुटखामाफियांना चांगलाच झटका बसला आहे.

Beed Crime News
Tree planting : बीड जिल्ह्यात एकाच दिवशी ३० लाख वृक्ष लागवड

७ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातून गुटख्याने भरलेला ट्रक (क्र. DD-02/S-9442) केजमार्गे धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे येणार असल्याची गुप्त माहिती केज पोलिसांना मिळाली. तत्काळ पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सापळा रचण्याचे आदेश दिले. फिल्मी स्टाईलने पाठलाग, पळणाऱ्या आरोपीचा शेतात शोधसहायक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, झडख उमेश निकम, कॉन्स्टेबल कागदे, सोपने, मुंडे, पाशा, आणि वाहन चालक झङख दराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भरधाव निघालेल्या ट्रकचा केजपासून दीड किलोमीटरवर कमल पेट्रोल पंपाजवळ ओव्हरटेक करून अडवला.

पोलिसांचा इशारा मिळताच ट्रक थांबवण्यात आला, परंतु त्याच क्षणी परशुराम मोहन गायकवाड (२२, एकनाथवाडी) हा ट्रकमधून उडी मारून जवळच्या शेतात पळून गेला. चिखल, काटे, व शेतातील अडथळे पार करत पोलिसांनी त्याचा माग घेतला. शेवटी एका बांधाच्या खड्याजवळ पाण्यात लपलेला असताना त्याला अचूक ओळखून ताब्यात घेतले.

Beed Crime News
Beed Crime : नृत्यकलेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे अपहरण; केजमधील कला केंद्र पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

या प्रकरणी रईसोयीन अमीरोद्दीन शेख (५९, रतलाम, म.प्र.), परशुराम गायकवाड, जालीमसिंग (बुरहानपूर) आणि रुपेश मालपाणी या चौघांविरोधात खझउ १२३, २३३, २७४, २७५ व खाद्य सुरक्षा संदर्भात कलमे २६ (२) (र्डी), २७ (३) (ऊ), ३०(२), ५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे करत आहेत.

गुटख्याचा मोठा साठा, व्यापाऱ्याचे नावही समोर झडतीत ट्रकमध्ये तब्बल ७४ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा, तसेच ट्रकसह एकूण १ कोटी १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गायकवाडच्या चौकशीतून उघड झाले की, हा गुटखा इंदूरहून भरून रुपेश मालपाणी (कळंब, धाराशिव) या व्यापाऱ्यास पोहोचवायचा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news