परळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापतींच्या पतीवर कोयत्याने हल्ला; परिसरात खळबळ

या घटनेमुळे सिरसाळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
beed crime news
परळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापतींच्या पतीवर कोयत्याने हल्ला; परिसरात खळबळfile photo
Published on
Updated on

Husband of Parli APMC Deputy Chairperson Attacked with a koyta; Incident Sparks Sensation in the Area

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. जयश्री जाधव यांचे पती डॉ. संजय जाधव यांच्यावर सिरसाळा-गोवर्धन रोडवर रविवारी (१९ एप्रिल) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात इसमांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे सिरसाळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

beed crime news
Beed News : कवडगावात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ

मिळालेल्या माहितीनुसार, संजय जाधव हे रात्री ११:३० च्या दरम्यान गोवर्धनहून आपल्या शेतातून घराकडे आपल्या मोटरसायकलने येत होते. यावेळी शेताजवळ रस्त्यावर ५ ते ६ जणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने थेट हल्ला चढवला. जाधव यांच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर कोयत्याने गंभीर वार करण्यात आले, तसेच रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

अत्यंत गंभीर स्थितीत असतानाही संजय जाधव यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेत जवळच असलेल्या एका शेतातील घराचा आधार घेतला. तेथून त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जाधव यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

beed crime news
Purna Crime | गौर येथे वाढदिवस साजरा करताना वाद; हाणामारीत एक गंभीर जखमी, स्कॉर्पिओ जाळली

या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, भररस्त्यात उपसभापतींच्या पतीवर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

जुन्या वादाची पार्श्वभूमी...

दरम्यान, डॉ. संजय जाधव यांचा काही महिन्यांपूर्वी गावातीलच एका युवकाबरोबर वाद झाला होता. या युवकाला एका प्रकरणात समजावून सांगताना त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ त्यावेळी व्हायरल झाला होता. याचवेळी या युवकाने त्यांना 'तुझे बघून घेतो, तुला सोडणार नाही' अशी धमकी दिली होती अशी माहिती पुढे आली आहे.

या पूर्ववैमनस्यातूनच डॉ. संजय जाधव यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या डॉ. संजय जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत लवकरच पोलीस प्रक्रिया पूर्ण होऊन संजय जाधव यांच्या जवाबानंतर गुन्हा दाखल होईल व यातूनच या हल्ल्याचे कारण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news