Purna Crime | गौर येथे वाढदिवस साजरा करताना वाद; हाणामारीत एक गंभीर जखमी, स्कॉर्पिओ जाळली

पूर्णा तालुक्यातील गौर गावात वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले
Purna Gaur birthday clash
Purna Gaur birthday clashPudhari
Published on
Updated on

Purna Gaur birthday clash

पूर्णा: तालुक्यातील गौर गावात वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले, तर संतप्त जमावाने एका स्कॉर्पिओ वाहनास आग लावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गौर गावातील जुन्या बसस्थानक परिसरात काही युवकांनी रस्त्यावर दुचाकी आडवी उभी करून वाढदिवस साजरा सुरू केला होता. त्याचवेळी एक पानपट्टी चालक तेथून जात असताना त्याने रस्ता मोकळा ठेवण्याबाबत सूचना केली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. गाडीला धक्का लागल्याने व आधीच्या वादाची पार्श्वभूमी असल्याने काही जणांनी संतापाच्या भरात धारदार ‘कत्ती’ने हल्ला केला, ज्यात एक जण गंभीर जखमी झाला.

Purna Gaur birthday clash
Purna Crime | आलेगाव शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १० जणांना अटक; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

घटनेची माहिती गावात पसरताच मोठा जमाव घटनास्थळी जमला. संतप्त लोकांनी तेथे उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी पेटवून दिली, ज्यात वाहन पूर्णतः जळून खाक झाले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी व्यक्तीला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Purna Gaur birthday clash
Purna Crime | पूर्णेत तरुणावर प्राणघातक हल्ला; दीड लाखांचा ऐवज लुटला

या प्रकरणी सुशिल उर्फ काली केशव पारवे यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावाला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news