Beed News : कवडगावात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ

दोन घरांमध्ये दरोडा; तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
beed news
Beed News : कवडगावात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळfile photo
Published on
Updated on

Beed News: Armed robbers attack Kavadgaon

वडवणी, पुढारी वृत्तसेवा वडवणी तालुक्यातील जुने कवडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दोन घरांमध्ये घुसून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी महिलांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या अंगावरील सुमारे साडेचार तोळे सोने व तीन हजार रुपयांची रोकड असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान प्रतिकार करणाऱ्या २२ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जखमी करण्यात आले.

beed news
Beed Crime | चरणाऱ्या मेंढ्यांनी मोटरसायकल पाडल्याने वाद विकोपाला, दोन मेंढपाळ भावांना कुऱ्हाडीने मारहाण!

जुने कवडगाव येथील शेख सिद्दीक शेख अनीस हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच सशत्र दरोडेखोरांनी घराच्या पाठीमागील गेटमधून प्रवेश केला. त्यांच्या हातात चाकू, लोखंडी रॉड व अन्य धारदार शखे होती. घरात शिरताच त्यांनी सिद्दीक यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावून धमकावत त्यांच्या अंगावरील दागिने व काही नगदी रक्कम हिसकावून घेतली.

पहिल्या घरात दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी शेजारील आदित्य युवराज काळे यांच्या घरात मागील बाजूने प्रवेश केला. येथेही त्यांनी आदित्य यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावून दागिने काढण्यास भाग पाडले. यावेळी आदित्य काळे यांनी धाडसाने दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला.

beed news
Beed Bus Accident | केजजवळ खासगी आराम बस पलटी होऊन जळाली; २० प्रवाशी जखमी

या हल्ल्यात आदित्य जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. सुमारे तासभर दरोडेखोरांचा परिसरात धुमाकूळ सुरू होता. घरातील सदस्यांनी आरडाओरड केल्याने गावातील नागरिक जागे झाले. काही ग्रामस्थांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला; मात्र त्यांनी शेज ारच्या शेतामधून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी श्वानपथक, फिंगरप्रिंट पथक, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) तसेच दरोडा प्रतिबंधक पथक घटनास्थळी पाचारण केले असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

दरम्यान, यापूर्वीही कवडगाव परिसरात अशाच प्रकारची दरोड्याची घटना घडली होती. त्या घटनेचा उलगडा झाला नसतानाच पुन्हा दरोडा पडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news