Beed Accident News : वारकऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात

केजजवळील घटना; एकजण जागीच ठार; अकरा जखमी
Beed Accident News
Beed Accident News : वारकऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघातfile photo
Published on
Updated on

Horrific accident involving a Warkari vehicle

केज, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत गावी जात असलेल्या वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या वाहनाचा बीड जिल्ह्यातील साळेगाव येथे केज-कळंब दरम्यान तिहेरी अपघात होऊन दिंडीचे ट्रॅक्टर, एक क्रूझर आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एका वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सात वारकरी आणि इतर चौघे असे एकूण अकराजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री घडली.

Beed Accident News
Jalna News : अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी केली मुलांच्या वसतिगृहाची पाहणी; सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

खामगाव-सांगोला महामार्ग (548-सी) वर केज ते कळंब दरम्यान साळेगाव येथील रामेश्वर कळसकर यांच्या चार्जिंग स्टेशन जवळ वाशिम जिल्ह्यात संत राघोजी महाराज संस्थान बोराळा येथील नरहरी नारायण वानखेडे महाराज यांच्या परतीच्या मार्गावर असलेल्या वाशिम जिल्ह्यातील दिंडीतील वारकरी हे केजच्या दिशेने जात असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर (एम एच 37-ए डी 3872) ला समोरून येणाऱ्या क्रूझर गाडी (एमएच 25-एएल 7020) ची जोराची धडक दिली.

या दोन वाहनांची धडक होताच याच रस्त्याने जात असलेली एक सुझुकी स्विफ्ट डिझायर कार (एम एच 20-बी एन 8243) अपघातग्रस्त वाहनावर धडकली. वारकऱ्यांचे ट्रॅक्टर, कूड़ार आणि कार या तीन वाहनांचा तिहेरी अपघात एवढा भयानक होता की, ट्रॅक्टर मधील वारकरी उडून रस्त्यावर पडले आणि ट्रॅक्टरचे हेड मधून तुटून त्याचे दोन भाग झाले आहेत.

Beed Accident News
Jalna News : पिस्तूल बाळगणारा तरुण जाळ्यात

अपघात दिंडीतील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून परतीच्या मार्गाने वाशिमकडे जात असलेल्या एका वृद्ध वारकऱ्याचा अंबाजोगाई येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. परतीच्या दिंडीतील वाशिम जिल्ह्यातील सात वारकरी जखमी झाले आहेत. तसेच क्रूझरमधील चौघे जखमी झाले. जखमी वारकऱ्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान घुगे यांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हलविले. तर धाराशिव जिल्ह्यातील जखमी चौघांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात गावाजवळ झाल्याने गावकरी अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीला धावून गेले.

अपातातील जखमी वारकरी

1) बळीराम मोतीराम मोसळकर, वय (77 वर्ष) (रा. पारडी मंगळूर, जि. वाशिम), 2) मल्हारी नारायण वानखेडे वय (75 वर्ष) (रा. वाशिम), 3) शंकर ज्ञानोबा बोधे वय (39) वर्ष), कॉडली, (रा. वाशिम), 4) जनार्दन महाले, वय (9 वर्ष) (रा. वाशिम), 5) सुमनबाई नारायण वानखेडे वय (65 वर्ष) (रा. वाशिम), 6) सुरेश मोतीराम मिराशे, वय (58 वर्ष) (रा. वाशिम), 7) हरिशसिंग किसनसिंग बायस, वय (74 वर्ष) (रा. वाशिम), 8) हरिदास मनोहर, वय (65 वर्ष) (रा. इटकूर, ता. कळंब, जि. धाराशिव, 9) शंकर जाधव, (रा. इटकूर ता. कळंब, जि. धाराशिव), 10) सुभाष काळ, (रा. इटकूर, ता. कळंब जि. धाराशिव), 11) उत्तरेश्वर फरताडे, (रा. इटकूर, ता. कळंब, जि. धाराशिव), 12) रामदास जयाजी महाले, वय (70 वर्ष) (रा. वाशिम),

पोलिसही घटनास्थळी हजर

वारकऱ्यांच्या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने सहायक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर, गोविंद मुंडे आणि त्यांचे सहकारी अपघातस्थळी हजर झाले. अपघातातील जखमी वारकऱ्यांना तीन वेगवेगळ्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविल्यानंतर अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news