

Finally, the district collector inspected the children's hostel; Security is a concern
जालना, पुढारी वृत्तसेवाः येथील समाजकल्याण विभागाच्या मुलांच्या वसतिगृहाची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी (दि.२८ रोजी) अचानक नेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांचे राहणीमान, अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रत्यक्ष आढावा चितला. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार वातावरण उपलब्ध करून दिदेण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा नातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या दरम्यान, दैनिक पुढारीने या पंदर्भात जिल्ह्यातील वसतिगृहे संकटाच्या उंबरठ्यावर नथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यात वसतिगृहाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ही वसतिगृह १९८१ साली बांधण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी वसतिगृहातील इमारत, भोजनगृह व स्वयंपाकघराची पाहणी करून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची गुणवत्ता तपासली. परिसरातील स्वच्छता, आरोग्यविषयक विद्यार्थ्यांना सकस, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
सुविधा, विद्यार्थ्यांच्या खोल्या, स्वच्छतागृहे, व्यायामशाळा तसेच संगणक प्रयोगशाळेचीही त्यांनी पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने वसतिगृहात कडक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नियुक्त्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. वसतिगृह परिसरात मद्यपान, व्यसन किंवा अमली पदार्थांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबण्याचे आदेश त्यांनी दिले. कामात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी समाजकल्याण विभागाचे श्रीमती स्नेहल मोदाळे, विशेष अधिकारी, आर एस कर्दळे, गृहपाल उपस्थित होते.
वसतिगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश
वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम १९८१ साली झाले आहे. त्यामुळे सद्यस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. खिडक्या, दरवाजे, स्वच्छतागृहे यांची दुरुस्ती, इमारतीची रंगरंगोटी तसेच नागरी आणि विद्युत दुरुस्तीची कामे तातडीने प्रस्तावित करून पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून वसतिगृहात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छरदाणी उपलब्ध करून देणे, नियमित फवारणी करणे आणि आवश्यक डास प्रतिबंधक साधनांची व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.