Jalna News : पिस्तूल बाळगणारा तरुण जाळ्यात

कदीम जालना पोलिसांची कारवाई, ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Jalna News
Jalna News : पिस्तूल बाळगणारा तरुण जाळ्यातfile photo
Published on
Updated on

Young man carrying a pistol caught

जालना, पुढारी वृत्तसेवा : देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगून फिरणाऱ्या करण गणेश कांबळे (वय २२, रा. शास्त्री मोहल्ला, जुना जालना) याला कदीम जालना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मोबाईल असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Jalna News
Aadhaar Authentication : ७८ हजार २१५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना गुप्त माहिती मिळाली. शास्त्री मोहल्ला, कुटरवटा, जुना जालना परिसरात एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.

संशयिताची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल, त्याच्या मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस तसेच खिशात मोबाईल आढळून आला. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna News
Jalna Rain : तीन तास मुसळधार पाऊस, शहर जलमय

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news