Beed Rain : मुसळधार पावसामुळे कानडी - देवठाणा रस्त्यावरील पूल गेला वाहून; वाहतूक ठप्प

या रस्त्यावरील हा पूल गेल्या दोन वर्षात दोन वेळेस वाहून गेला.
Beed Rain
Beed Rain : मुसळधार पावसामुळे कानडी - देवठाणा रस्त्यावरील पूल गेला वाहून; वाहतूक ठप्प File Photo
Published on
Updated on

Heavy rains wash away bridge on Kanadi-Deothana road; traffic disrupted

तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील ओढ्याला पूर आल्याने कानडी-देवठाणा रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. या रस्त्यावरील हा पूल गेल्या दोन वर्षात दोन वेळेस वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Beed Rain
Beed ST Bus Accident | चालत्या एसटीची मागील दोन चाके निखळली; चालकाच्या प्रसंगावधानाने ७० प्रवाशांचे प्राण वाचले!

मंठा तालुक्यातील देवठाणा परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याला मोठा पूर आल्याने या ओढ्यावरील कानडी-देवठाणा रस्त्यावरील वाहून गेला आहे. या पुलाची उंची वाढविण्या सोबतच पुलाचे कामही दर्जेदार होणे गरजेचे आहे. या ओढ्यातून तळणी परिसरात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. हा ओढा जवळच असलेल्या पूर्णा नदीला मिळतो. या ओढ्यावर मोठा पूल झाला तर कायमस्वरुपी उपाययोजना होऊ शकते.

देवठाणा येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या कानडी शिव ारात आहेत. सध्या पुलाची एक बाजू क्षतिग्रस्त झाली असुन दुसऱ्या बाजूलाही तडे जाऊन पूल खचला आहे. दोन वर्षांपूर्वी या फरशी पुलाच्या कामासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रार केल्याचे समजते. या पुलाचे काम व रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत करण्यात आले आहे. या परिसरात बागायत शेती आहे. तसेच, देवठाणा-उस्वद येथील शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा मार्गच पूल वाहून गेल्याने बंद झाला आहे. त्यासाठी तातडीने पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.

Beed Rain
Beed ST News | चालकाच्या डोक्‍यावर प्रवाशाने धरली छत्री : अंबाजोगाई आगारातील एसटी बसेसची अवस्‍था चव्हाट्यावर

नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तळणी येथील केटी बंधाऱ्याचा साईडपंखा पूर्णपणे पडला आहे. या बंधाऱ्याच्या बाजूची भिंत शिल्लक आहे. ही भिंत पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी जाऊन शेतकऱ्यांच्या विहीर व शेतीचे नुकसान झाले आहे.

या रस्त्यासह फरशी 66 युलाम्चा देख भारर्श दुरुस्तीची मर्यादा पाच वर्षांची असून ज्या ठिकाणी पूल खचला आहे तो भाग संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेण्यात येईल. तसेच हा फरशी पुलावरून पाणी जाण्यासाठीच आहे. जास्त प्रमाणात पाणी आल्याने पुलाचे नुकसान झाले.
-टी. एल. म्हस्के, (उपअभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना)
या पुलाच्या अडचणी संदर्भात देवठाणा कानडी येथून अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना पुलाच्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल याबाबत सूचना दिल्या.
बबनराव लोणीकर आमदार, परतूर मंठा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news