Heavy rain : तळणी परिसरात पडला जोरदार पाऊस

पेरणीसाठी शेतकऱ्यांची वेट अॅण्ड वॉचची भूमिका
Heavy rain
Heavy rain : तळणी परिसरात पडला जोरदार पाऊसfile photo
Published on
Updated on

Heavy rain lashed the Talni area

तळणी, पुढारी वृत्तसेवाः मंठा तालुक्यातील तळणी परिसरात बुधवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सुमारे दोन तास पडलेल्या या पावसामुळे उकाडा कमी होण्यास मदत झाली आहे. पाऊस पडूनही पुरेशी ओल न गेल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

Heavy rain
Beed Agriculture News : अर्धा जून महिना संपला, पाऊस बेपत्ता!

जून महिना संपत आला तरी मंठा तालुक्यातील तळणी परिसरात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला होता. परंतु, बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तब्बल एक तास दमदार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, गेल्या काही दिवसांपासून सोसाव्या लागणाऱ्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बुधवारी झालेल्या एका तासाच्या दमदार पावसामुळे गुरुवारपासुन शेतकरी शेतीकामांच्या नियोजनात व्यस्त होणार आहेत. मात्र, हा पाऊस पेरणीयोग्य आहे का, याबाबत शेतकरी अजूनही चाचपणी करत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत जर परिसरात असाच आणखी पाऊस झाला, तरच प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात होऊ शकते. पावसाची सरासरी आणि जमिनीतील ओलावा पाहूनच शेतकरी पेरणीचा अंतिम निर्णय घेतील.

Heavy rain
Jalna News : वरुणराजाच्या आगमनाकडे बळीराजाचे डोळे

चारा आणि पाण्याचे संकट कायम !

बुधवारच्या पावसामुळे आशेचा किरण निर्माण झाला असला, तरी संकट पूर्णपणे टळलेले नाही. या पावसात पुढील काळात सातत्य राहिले, तर एक ते दीड महिन्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई दूर होऊ शकते. परंतु, जर पावसाने पुन्हा खंड दिला, तर मात्र या परिसरात चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच शासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news