बीड : जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांच्या जीवन संपवल्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 17 जानेवारी रोजी जीवन संपवले केली होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये प्रदीप फाटे या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मानसिक त्रास असल्याचे त्यांनी लिहिले होते.
या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल चाळीस दिवसांनी प्रदीप फाटे याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.