

गेवराई ःबाग पिंपळगाव वसाहत येथून गेवराई कडे आपल्या दुचाकीवरून येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 42 वर्षीय शिक्षक गंभीर झाले होते. त्यांच्यावर गेवराई येथील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी रात्री दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. मयुर संजय येवलेकर असे मयताचे नाव आहे.
गेवराई शहरातील महात्मा फुले नगर येथील रहिवासी असलेले मयुर संजय येवलेकर हे गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव वसाहत येथील श्रीसंत भगवान बाबा माध्यमिक विद्यालयात हिंदी विषयाचे सह - शिक्षक म्हणूनकार्यरत होते. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या परत येत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ गेवराईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे रेफर करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी रात्री दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. गुरुवारी दुपारी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई,वडील, भाऊ , भावजय असा परिवार आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.