

डोणगाव ः जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील चार दुकाने आगीत जळून खाक झाली आहे. दुकानातील साहित्य जळाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून आग शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील श्रावणी किराणा दुकान, दूध डेअरी, संगणक प्रशिक्षण केंद्र, टी हाऊस जळाले आहे. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग मध्यरात्री लागली आहे. दुकानांना आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. तसेच आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाची गाडी पोहचेपर्यंत दुकाने जळून खाक झाली होती.
जाफराबाद येथील अग्निशमन विभागाला अनेकदा फोन करून प्रतिसाद मिळाला नाही. विदर्भातील देऊळगाव राजा येथील अग्निशमन विभागाला माहिती दिली. ही अग्निशमन विभागाचे वाहन रात्री दोन वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागाचे वाहन उशिरा आल्याने दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते.
यात आगीत 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला. ही दुकाने रोहित प्रल्हाद झोरे, विजय भगवान अंभोरे, समाधान देवराव गोरे आणि दत्तात्रय देविदास घोडके यांच्या मालकीची होती. जाफराबाद येथील तहसील महसूल विभागाचे तलाठी योगिता सवडे यांनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शॉर्टसर्किटमुळे आग
चार ही दुकाने शेजारी-शेजारीच्या बांधण्यात आलेल्या आहे. दुकानासमोरून विद्युत वाहिनीच्या तारा गेलेल्या आहे. या विद्युत तारामुळे शॉर्टसर्किट होऊन लागल्याची ग्रामस्थ व दुकानदार यांचे म्हणणे आहे.