Beed Water Crisis : मादळमोहीत १६ गावच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको !

जायकवाडी धरणातून विशेष प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी द्या
All Party Road Block Agitation
All Party Road Block Agitationpudhari photo
Published on: 
Updated on: 

गेवराई : जायकवाडी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी "विशेष प्रादेशिक पाणी पुरवठा योजना" या योजनेच्या मंजुरीसाठी शुक्रवार दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक, मादळमोही ता. गेवराई येथे १६ गावातील नागरिकांच्या वतीने सर्व पक्षीय भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जायकवाडी (नाथसागर) पैठण येथून मादळमोही सह सैदापूर, तांदळा, काजळा, कोळगाव तहत साठेवाडी, खडकी तहत टाकळगव्हाण, सावरगाव, पोखरी, शिरस मार्ग, भडंगवाडी, जव्हार वाडी, मानमोडी, मुळूकवाडी, वंजारवाडी, कुंभारवाडी, शहाजनपुर (च.) तहत लोळदगाव/अनकुटा या १६ गावांना कायमस्वरूपी पिण्याचे हक्काचे पाणी स्वतंत्र "विशेष प्रादेशिक पाणीपुरवठा योजना" जलवाहिनी द्वारे मिळणे बाबत.

All Party Road Block Agitation
Bhoom Congress Protest : मतदार यादीतील अनियमिततेच्या चौकशीची मागणी

तसेच मादळमोहीसह नमूद १६ गावांना एकत्रित करून जायकवाडी धरणावर आधारित स्वतंत्र 'विशेष प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना' तातडीने घोषित करून तिला विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच या १६ गावात दुष्काळात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम सुरु करावे व मागेल त्याला काम देत न्याय द्यावा. मादळमोही व परिसरातील १६ गावातील जनावरे, पशुधन यांचेसाठी पाण्याची व चाऱ्यासाठी विनाविलंब तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यासाठी १६ गावातील नागरिकांच्या वतीने सर्व पक्षीय भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

काही वेळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान महसूल विभागाचे नायब तहसीलदार व पाणीपुरवठा अभियंता यांना निवेदन देण्यात आले. माजी मंत्री बदामराव पंडित, युवा नेते शिवराज पवार, राजेंद्र मोटे, अजय दाभाडे सह आदिनी पाठींबा दिला.

All Party Road Block Agitation
Jalna Illegal Sand Mining : गोदावरी नदीपात्रातून २५० ब्रास वाळूची चोरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.