Beed Fuel Shortage | गेवराईत इंधन टंचाईचा फटका; पेट्रोल पंप कोरडे, नागरिक हैराण

काही तासांतच साठा आटल्याने दुपारपर्यंत अनेक ठिकाणी ‘नो स्टॉक’चे फलक झळकू लागले
Gevrai Petrol Pump
Gevrai Petrol PumpPudhari
Published on
Updated on

Gevrai Petrol Pump News

गेवराई : गेवराई शहरासह तालुक्यात इंधन टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गुरुवारी (दि.३०) सकाळी काही पंपांवर मर्यादित प्रमाणात इंधन उपलब्ध होते; मात्र काही तासांतच साठा आटल्याने दुपारपर्यंत अनेक ठिकाणी ‘नो स्टॉक’चे फलक झळकू लागले. परिणामी वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.

Gevrai Petrol Pump
Gevrai Accident | गेवराईतील अपघाती मृत्यूप्रकरणी ३८ दिवसांनंतर गुन्हा दाखल

इंधनाअभावी दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यातच बंद पडत असून अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. नोकरदार, व्यापारी आणि शेतकरी वर्गालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.

पेट्रोल पंप चालकांच्या माहितीनुसार, इंधन पुरवठा साखळीत आलेले अडथळे, टँकर वाहतुकीतील विलंब आणि पेमेंट प्रक्रियेत होणारा उशीर यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवाढीच्या शक्यतेमुळे कंपन्यांकडून आगाऊ रकमेची मागणी होत असल्याने लहान पंपधारक अडचणीत सापडले आहेत.

Gevrai Petrol Pump
Gevrai Youth Death | गेवराईत तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले

दरम्यान, शहरातील बहुतांश पंप कोरडे पडल्याने वाहनधारक एक पंप सोडून दुसऱ्याकडे धाव घेत आहेत. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या असून अनेकांना आपली वाहने ढकलत न्यावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या सर्व पंप चालक टँकरच्या प्रतीक्षेत असून, वाहतुकीतील अडथळ्यांमुळे इंधन पोहोचण्यात उशीर होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news