Beed Murder : दोन मैत्रिणींचा जीव एकाच तरुणावर जडला अन् एका मैत्रिणीने दुसरीचा गळा आवळला...

मैत्रिणीचा गळा दाबून खून करत तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.
Beed News
Beed News : दोन मैत्रिणींचा जीव एकाच तरुणावर जडला अन् एका मैत्रिणीने दुसरीचा गळा आवळला...File Photo
Published on
Updated on

Friend strangles friend, throws her body in Nala

बीड, पुढारी वृत्तसेवा : दोन मैत्रिणींचा जीव एकाच तरुणावर जडला अन् यातूनच एका मैत्रिणीने दुसरीचा गळा दाबून खून करत तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. गुरुवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत खून करणार्या खून; महिलेसह मुलाला ताब्यात घेतले. या मुलाला अटक महिलेला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Beed News
Bail Pola : 'बजरंग'चा मालक हीच ओळख माझ्यासाठी मोठी', शर्यतीमुळे ग्रामीण तरुणाईत बैलांची क्रेझ, किमतीही लाखात

अयोध्या राहुल व्हरकटे (२६) असे मृत महिलेचे नाव आहे. ती बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी तिची होमगार्डमध्ये भरती झाली होती. यानंतर ती बीडच्या अंबिका चौक परिसरात राहण्यास आली व पोलिस भरतीचीही तयारी करत होती.

अयोध्याची वृंदावणी फडताडे नावाची मैत्रीण होती. तिचे राठोड नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांनंतर राठोडची अयोध्याशी जवळीक वाढली. यामुळे फडताडेला ही बाब सहन झाली नाही. तिच्या मनात अयोध्याविषयी प्रचंड राग होता. तिने अयोध्येचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिने यासाठी काही साथीदारांची मदत घेऊन प्लॅन रचला. दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्येला घरी बोलावून घेतले.

Beed News
Beed News : सरकारी वकिलाने जीवन संपवले; न्यायाधीश, लिपिकाविरुद्ध गुन्हा

घरी त्यावेळेस कुणीच नव्हते. तिने इतरांच्या मदतीने अयोध्येचा गळा दाबला. तसेच खून केला.. स्थानिकांना गुरुवारी सकाळी मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरुवात केली. तपासात पोलिसांना लव्ह ट्रायंगलमधून अयोध्येचा मृत्यू असल्याची माहिती मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news