

Four people kidnap and beat one person to recover money
धारूर पुढारी वृत्तसेवा उसने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे व्याजासह ८० हजार रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी एका तरुणाचे चौघा जणांनी अपहरण करत मुलगा जिवंत पाहिजे असेल तर पन्नास हजार टाका नसता तो तुम्हाला दिसणार नाही, अशी धमकी देत त्याला जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी धारूर तालुक्यात घडली. या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे तर दोघेजण फरार आहेत.
मैंदवाडी येथील कृष्णा मैंद याने धनराज चाटे, पृथ्वीराज राख, परमेश्वर आघाव व अन्य एकाकडून दहा हजार रुपये उसने घेतले होत. त्याचे व्याजासह ८० हजार झाल्याचे कारण सांगत या चौघांनी कृष्णाला स्कॉर्पिओमध्ये बसवत अंबाज ोगाईकडे घेऊन गेले. कृष्णा याने घरी फोन लावत झालेल्या प्रकाराची माहिती त्याच्या आईला दिली.
यावेळी त्यांच्यापैकी एकाने कृष्णाच्या आईला तुमचा मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आताच्या आता पन्नास हजार रुपये टाका नसता तर तुम्हाला दिसणार नाही असे म्हणत फोन कट केला. यानंतर कृष्णाच्या आईने गावातील लोकांच्या मदतीने धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी तातडीने सूत्रे हलवत तपास सुरू केला. यावेळी आरोपींवर कारवाई करत पृथ्वीराज राख व परमेश्वर आघाव या दोघांना ताब्यात घेतले तर धनराज चाटे व अन्य एक जण फरार झाला.
त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या चौघांनी कृष्णा याला मारहाण करत येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रोडवर जखमी अवस्थेत सोडले असल्याचे सांगितले. कृष्णा मैंद याला दहा हजार रुपये एक हजार रुपये रोजाप्रमाणे दिले होते त्याबद्दल त्याच्याकडे ८० हजार रुपये झाले होते व त्याने रोख तीस हजार रुपये दिल्यानंतर ही पन्नास हजार रुपये बाकी असल्याने त्याला उचलून आणले होते असे त्याने सांगितले.