Gevrai News : मुक्ताईंची पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाल्याने वातावरण भक्तिमय, गढी येथील जयभवानी मंदिरावर रिंगण सोहळा

जय मुक्ताबाई... विठ्ठल विठ्ठल ! या गगनभेदी जयघोषांनी गेवराईच्या रस्त्यावर भक्तीचा महासागर उसळला.
Gevrai News
Gevrai News : मुक्ताईंची पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाल्याने वातावरण भक्तिमय, गढी येथील जयभवानी मंदिरावर रिंगण सोहळाFile Photo
Published on
Updated on

The atmosphere is devotional as Muktai's palanquin enters Beed district

गेवराई, पुढारी वृत्तसेवा जय मुक्ताबाई... विठ्ठल विठ्ठल ! या गगनभेदी जयघोषांनी गेवराईच्या रस्त्यावर भक्तीचा महासागर उसळला. संत मुक्ताबाईच्या पवित्र पादकांचे दर्शन घेण्यासाठी शहरात हजारो भाविकांचा जनसागर लोटला आणि संपूर्ण नगरच जणू भक्तीरसात न्हालं. मुक्ताईची पालखी गढी येथे पोहचताच रिंगण सोहळा पार पडला.

Gevrai News
Beed news | गेवराई शहरातील छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी अखेर पोलिस प्रशासनाने केली सिल

तापी तिरावरील मुक्ताई नगर येथून प्रस्थान केलेली ही पालखी ६ जिल्ह्यांतून सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करत, २८ मुक्कामांनंतर ३ जुलै रोजी पंढरपुरात विठुरायाच्या भेटीला पोहोचणार आहे. सजवलेला रथ, चांदीच्या पादुका, आणि एक हजारांहून अधिक वारकऱ्यांचा जल्लोष या सोहळ्याचे आकर्षण ठरले आहे.

गुरुवारी सायंकाळी संत मुक्ताबाई पालखीचे गेवराई शहरात आगमन होताच, ढोल-ताशांचा कडकडाट झाला, टाळ-मृदंगांचा निनाद आसमंतात घुमू लागला आणि हरिनामाचा गजर शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. महिलांच्या रांगांमध्ये भगवे झेंडे लहरले, तर लहानग्यांनी हातात टाळ घेऊन मुक्ताईच्या पावलांशी आपली नाळ जोडली.

Gevrai News
Beed Dowry Harassment | सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन

चिंतेश्वर मंदिरापर्यंत सारा रस्ता फुलांनी सजवलेला, रांगोळ्यांनी नटलेला आणि श्रद्धेच्या मनोऱ्यांनी उठून दिसत होता. फुलांची उधळण, जलसेवा, पादुकांवर अभिषेक, कीर्तन, हरिपाठ... सगळं जणू एका दिव्य अनुभूतीत एकवटलं होतं. शुक्रवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने गढ़ी परिसरात गोल रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.

पालखीभोवती घोड्यांची रिंगणं, वारकऱ्यांची गर्दी, आणि मुक्ताईच्या जयघोषांनी आसमंत भरून गेला. रिंगण पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी गढी परिसर गजबजून टाकला होता. अनेकांना डोळे भरून आले, काहींनी पाया पडताना मुक्ताईच्या रथात मनसोक्त भाव अर्पण केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news