

गेवराई : बीडमधील गेवराई शहरातील छत्रपती मल्टिस्टेटला अखेर आज शुक्रवारी पोलीस प्रशासनाने सिल केले असून, ठेविदारास कोट्यावधीचा चुना लाऊन चेअरमन संतोष भंडारी परागंदा झाला आहे. बीडमधील गेवराईच्या संतोष भंडारी याने छत्रपती मल्टिस्टेट या नावाची सोसायटी काढून त्याने राज्यातील विविध शहरात या सोसायटीच्या शाखा कार्यरत आहेत. मुख्य शाखा गेवराई शहरात जुन्या बसस्थानक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आहे.
जास्त व्याज दराचे अमिष दाखवून चेअरमन संतोष भंडारी याच्या छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीत कोट्यावधीच्या ठेवी तालुक्यातील शेतमजुर, शेतकरी,व्यावसायिक, तसेच महिला यांनी लाखो ठेवी केल्या. मात्र, सोसायटीतील जमा झालेली कोट्यावधीच्या ठेवी मुदत होऊन देखील मिळत नसल्याने ठेविदार त्रस्त झाले. त्यातच खळेगाव येथील सुरेश जाधव या शेतक-याची एक नव्हे तर तब्बल नऊ लाख रुपयाची ठेव सोसायटीत गुतंल्याने चकरा मारुन ही मिळत नसल्याने या शेतक-याने अखेर जीवन यात्रा संपविली.
यामुळे गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर दोषी चेअरमन संतोष भंडारी याच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळीच पोलीस प्रशासनाकडून गेवराई शहरातील असलेल्या छत्रपती मल्टीस्टेट सोसायटीला सिल करण्यात आले आहे.