

Forty murders in Parli till date, only four have come to light
बीड, पुढारी वृत्तसेवा: जिथे अन्याय होतो, तिथे मनोज जरांगे पाटील असतात. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी दादांनी लढा दिला, आता महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांसाठी लढत आहेत. परळीत असे चाळीस खून आजवर झाले, पण समोर केवळ चारच आल्याचा खळबळजनक आरोप खा. बजरंग सोनवणे यांनी केला.
स्व. महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी, या प्रकरणातील आर-ोपींच्या अटकेच्या मागणीसाठी व्यापक बैठक बीडमध्ये पार पडली. शुक्रवारी दुपारी कॅनॉल रोड भागात झालेल्या या बैठकीत खा, बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक दावे केले. खा. सोनवणे म्हणाले की, देश विघातक कृत्य करणारी लष्कर ए तोयबा संघटना आहे, त्या दहशतवादी संघटनेपेक्षाही घातक अशी संघटना परळीत आहे. असं आम्ही बोललो तर काहीजण म्हणतात आमच्या मातीला बदनाम करू नका, आमच्या जातीला बदनाम करू नका. पण हे असे कृत्य होत असताना पोलिस यंत्रणा काय करत आहे? परळीत आजवर चाळीस खून झाले, समोर फक्त चार आले असा आरोप खा. सोनवणे यांनी केला.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात काही आर-ोपींना अटक झाल्याची चर्चा आहे, परंतु असे काहीही झालेले नाही. केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचे देखील खा. सोनवणे यांनी यावेळी सांगितले. आ. सोळंकेंच्या हत्येचा कट होता गलथर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी आपल्या भाषणात खळबळजनक खुलासे केले. बीडमधील परिस्थितीला काही लोक जबाबदार आहेत. संवेदनशील प्रकरणात देखील ते सोशल मिडीयावर चुकीच्या पोस्ट करतात. याबाबत मी त्यांच्या नेत्यांना अनेकदा सांगितले पण फरक पडला नाही. पण तेच नेते अशा समर्थकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये जाळपोळ झाली, वे षडयंत्र होते.
सहा तास जाळपोळ सुरू असताना बीडमधील पोलिस यंत्रणा लाठीमारसुद्धा करत नाही, हे कसे काय होते? प्रकाशदादांच्या घरी जाळपोळ झाली, त्यात प्रकाश सोळंके यांच्या हत्येचा कट होता आणि त्याचा आरोप जरांगे पाटील यांच्यासह इतरांवर ठेवायचा डाव होता. या सगळ्या प्रकारात त्यांनीच लोक घुसवले होते असा आरोप स्वप्नील गलघर यांनी केला. तसेच त्यावेळी मला वाल्मीक कराडचा फोन आला होता की भय्या तुझ्या घराजवळ कोणी आले तर मी पोलिसांना गोळीबार करायला सांगितला आहे. पण मी परत पोलिसांना फोन करून सांगितले की असे काहीही करू नका, माझ्या घराकडे कोणी येणार नाही, आले तर मी सोडणार नाही. तुम्ही माझ्या घराकडे येऊ नका असे पोलिसांना सांगितल्याचेही स्वप्नील गलधर यावेळी म्हणाले.
ओबीसी कुटुंबाला न्याय देण्यासाठी जरांगे पाटील मैदानात
आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचा अभिमान आहे. ते आज एका ओबीसी कुटुंबाला न्याय देण्यासाठी मैदानात उतरले आहेत, दादांनी कधीही जातीवाद केला नाही. वाल्मीक कराडनेच दोन जातीत भांडणे लावली. आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी ताईंना न्याय देण्यासाठी लढा उभारला जात आहे. काही दिवसांपूर्वी मी आ. रोहित पवार यांच्यासोबत परळीत गेलो होतो. त्यावेळी ज्ञानेश्वरीताईंनी सांगितले की, माझ्या मुलाने स्मशानभूमीत शपथ घेतली की माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना मी संपवणार. मला खूप वाईट वाटले, एका मुलाला आपल्या पित्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी अशी शपथ खाण्याची वेळ येत आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ कारवाई करायला हवी. काही दिवसांपूर्वी विजय पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मी स्वतः मागणी केली की एसआयटी स्थापन करा, विजय पवार यांच्या क्लासेसमध्ये आणि शाळेमध्ये चारशे कॅमेरा आहेत, त्यातील डाटा समोर येणार आहे. आम्ही त्यात दोषी आढळलो तर आम्हाला आत टाका असेही आ. क्षीरसागर म्हणाले.
मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर
स्व. महादेव मुंडे खून प्रकरणात व्यापक जनआंदोलन उभारण्यासाठी झालेल्या बैठकीवेळी स्टेजवर मुंडे व देशमुख कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती. या प्रकरणात लडा देणाऱ्या बाळा बांगर यांच्या भाषणावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह त्यांच्या मुलांना अश्रू अनावर झाले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे भाषण सुरू असतानाही मुंडे कुटुंबाने आपल्या अश्रूना वाट मोकळी करून दिली. यावेळी उपस्थितही भावनिक झाल्याचे पहायला मिळाले.
न्यायासाठी विष प्राशन करण्याची वेळ
माझ्या पतीची हत्या होऊन एकवीस महिने झाले तरीही मारेकरी पकडले गेले नाहीत. माझ्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी मला विष प्राशन करण्याची वेळ आली. तरीही प्रशासन हालचाल करत नव्हते. अखेर मी मनोज दादांची भेट घेतली, त्यांनीच मला मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील मला शब्द दिला आहे की कोणालाही पाठीशी घालणार नाही, तो त्यांनी खरा करून दाखवावा असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.
दादा देतील तो आदेश मान्य आ. सोळंके
आ. प्रकाश सोळंके यांनी यावेळी अतिशय मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. स्व. महादेव मुंडे यांचे मारेकरी एकवीस महिन्यांनंतरही सापडत नाहीत, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा हाती घेतला आहे, आज त्यासाठीच ही बैठक होत आहे. ते जो आदेश देतील त्याप्रमाणेच यापुढे आम्ही आंदोलनात सहभागी होऊ असा शब्दा आ. प्रकाश सोळके यांनी दिला.