

Jarange Patil in the field for justice for Mahadev Munde
बीड, पुढारी वृत्तसेवा : स्व. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला एकवीस महिने उलटले आहेत. आता एसआयटी स्थापन करण्यात आली असली तरी येत्या आठ दिवसात यातील आरोपी अटक झाले नाही तर बीड जिल्हा बेमुदत बंद केला जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. स्व. महादेव मुंडे यांच्या कुटूंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवारी दुपारी बीडमध्ये आयोजीत बैठकीत जरांगे पाटील बोलत होते.
स्व. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीकरिता आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बीड शहरातील कॅनॉल रोड भागातील मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी बैठक झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील, खा. बजरंग सोनवणे, आ. प्रकाश सोळंके, आ.संदिप क्षीरसागर यांच्यासह देशमुख व मुंडे कुटूंबीयांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली.
जरांगे पाटील म्हणाले, दोन दिवसांपूर्वी प्रकाश सोळंके बोलले, यात लगेच विरोधकांची लाभार्थी टोळी त्यांच्यार तुटून पडली. पण या टोळीला मी धडा शिकवणार आहे. मी आधीच सांगितले आहे की दोन्ही बहीण भावाशी माझे वैर नाही, पण तुमची ही टोळी आवरा. आमच्यात दम आहे तुम्हाला निट करायचा, आणि ही टोळी निट राहिली नाही तर आम्ही त्यांना निट करु. तुमच्या शहरात खून होतो, एकवीस महिने आरोपी पकडले जात नाहीत, अशा स्थितीत तुम्ही मंत्रीपदाला लाथ मारली पाहिजे, पण तुम्ही मात्र मुंडे कुटूंब परळीतून निघाले की मुख्यमंत्र्यांना भेटता, त्यांना भेटू नका म्णून सांगता हे सगळी जनता बघत आहे. तुम्हाला माणसं मारण्यासाठी मंत्रीपद पाहिजे का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता विचारला.
की, आता पोलिस यंत्रणेला आदेश द्या, सगळे आरोपी पकडला. एकदा आरोपी पकडला की सोडायचा नाही, येत्या आठ दिवसात आरोपी अटक झाले पाहिजेत नाही तर संपूर्ण बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवला जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. या बैठकीला जिल्हाभरातून सर्व समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.