Beed Rain : विसर्गाच्या पाण्याने शेती उद्ध्वस्त, तीन शेतकऱ्यांची जमीन सलग तीन वेळा खरडली

पूर्णा नदी पात्रात धरणातून सोडलेल्या विसर्गाच्या पाण्यामुळे देवठाणा उस्वद येथील शेतजमिनींचा पुन्हा एकदा मोठा बळी गेला आहे.
Beed Rain
Beed Rain : विसर्गाच्या पाण्याने शेती उद्ध्वस्त, तीन शेतकऱ्यांची जमीन सलग तीन वेळा खरडलीFile Photo
Published on
Updated on

Farms destroyed by discharge water, land of three farmers washed away three times in a row

रवी पाटील

तळणी: पूर्णा नदी पात्रात धरणातून सोडलेल्या विसर्गाच्या पाण्यामुळे देवठाणा उस्वद येथील शेतजमिनींचा पुन्हा एकदा मोठा बळी गेला आहे. यावर्षी झालेल्या सततच्या पुरवठ्यामुळे विठ्ठल लोमटे, वनिता कांबळे व प्रयाग पुरी या तिघा शेतकऱ्यांची तब्बल तीन एकर जमीन पिकांसह वाहून गेली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याच शेतकऱ्यांची जमीन २००६, २०१८ आणि आता २०२५ मध्ये सलग तिसऱ्यांदा खरडून गेली असून अद्यापही त्यांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही मिळालेला नाही.

Beed Rain
Beed Rain : कापसाच्या झाल्या वाती; सोयाबीनची झाली माती

देवठाणा उस्वद येथील कोल्हापूर बंधारा अनेक वर्षांपासून भग्न अवस्थेत आहे. या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी तोटा झाला असून शेतजमिनीचे नुकसान कायम वाढत चालले आहे. या बंधाऱ्यामुळे नदीचे दोन प्रवाह तयार झाले असून शेतकऱ्यांची उरलेली थोडीफार जमीनही आता खचत आहे. रात्री झालेल्या विसर्गात पिकांसहित शेतजमीन वाहून आहेत. गेल्याने शेतकरी पूर्णपणे उघड्यावर आले या धोकादायक परिस्थितीत पूर्णा नदीवरील नव्याने बांधण्यात आलेला पाच कोटी रुपये खर्चाचा पूलही संकटात सापडला आहे. कारण खरडलेल्या जमिनीतून थेट पुलाच्या पिचिंगवर पाण्याचा प्रवाह येत असल्याने पुलाचा भराव वाहून गेला आहे.

लघु पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याची केवळ वरवरची दुरुस्ती केली असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. शेतकऱ्यांनी अनेकदा काळे कागद करून सरकारी दारं ठोठावली, पण त्यांना मोबदला मिळाला नाही. यामुळे शेतकरी आज अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे त्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकरी शासनाविषयी संताप व्यक्त करत आहेत. पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात.

Beed Rain
Beed Rain: केज तालुक्यात परप्रांतीय मजुरांची दयनीय अवस्था; तहसीलदार आणि व्यापारी महासंघ मदतीसाठी पुढे
पुलाच्या पाठीमागील भराव सतत खचत असून जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. जर विसर्ग वाढला, तर पुलालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
- भगवान शिंदे, शाखा अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news