Employment Guarantee Scheme : रोजगार हमीची कामे यंत्राने; हजेरीसाठी बनावट ॲप

धारूरमधील धक्कादायक प्रकार; कागदोपत्री चार हजारांवर मजूर
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme : रोजगार हमीची कामे यंत्राने; हजेरीसाठी बनावट ॲपfile photo
Published on: 
Updated on: 

Employment Guarantee Scheme : Employment guarantee works by machine; Fake App for Attendance

धारूर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळामुळे शेतीतील रोजगाराच्या संधी संपुष्टात आल्या असताना, धारूर तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर यंत्रांचा वापर होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. तालुक्यात तब्बल 26 हजार 899 मजूर रोजगारासाठी उपलब्ध असताना, सध्या 4 हजार 88 मजूर कार्यरत असल्याची नोंद आहे.

Employment Guarantee Scheme
Beed News : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू

दर आठवड्याला 510 मस्टर काढण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, प्रत्यक्षात किती मजुरांना काम मिळते आणि किती कामे यंत्रांच्या साह्याने केली जातात, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गंभीर बाब म्हणजे हजेरी नोंदवण्यासाठी बनावट अॅपचा देखील उपयोग केला जात असल्याचे समोर आले आहे.

धारूर तालुका डोंगराळ भागात असून यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाअभावी ख्बीची पेरणीही संकटात असल्याने शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. दरवर्षी कापूस वेचणी, खुरपणी आणि फवारणीच्या माध्यमातून मिळणारा रोजगारही यंदा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील आठ महिने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न मजुरांसमोर उभा आहे.

तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत पांदण रस्त्यांची 27, गायगोठ्यांची 6, शेततळ्यांची 11, सिंचन विहिरींची 110, घरकुलांची 15 आणि वृक्षलागवडीची 15 कामे सुरू असल्याची माहिती आहे.

Employment Guarantee Scheme
Beed News : भरचौकात दवाखाना थाटलेला बोगस डॉक्टर पकडला

मात्र, ही कामे सुरू असतानाही अनेक मजुरांना प्रत्यक्ष रोजगार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी कामे यंत्रांच्या साह्याने केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कामांची कागदोपत्री नोंद आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 4 हजार 88 मजूर कार्यरत असल्याची नोंद आणि दर आठवड्याला 510 मस्टर काढले जात असल्याची माहिती लक्षात घेता, कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष किती मजूर उपस्थित असतात, याची तपासणी होणे आवश्यक आहे. मस्टरवरील हजेरी, कामाचे स्वरूप आणि यंत्रांचा वापर यांची पडताळणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. तहसील कार्यालय आणि पंचायत समिती प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पात्र मजुरांना रोजगार मिळत आहे की नाही, हे तपासावे, अशी मागणी होत आहे.

ऊसतोडणीसाठी गाव सोडण्याची वेळ

गेल्या चार-पाच दिवसांपासून गावागावांतून मजूर ऊसतोडणीसाठी बाहेर पडू लागले आहेत. गावात काम नाही, पाणीटंचाईची चिंता आणि शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी, अशा परिस्थितीत स्थलांतराशिवाय पर्याय उरलेला नाही. रोजगार हमी योजनेचा उद्देश गावातच रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कामांची तपासणी करून पात्र मजुरांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून द्यावा. अन्यथा, दुष्काळाच्या संकटात मजुरांचे स्थलांतर आणखी वाढण्याची भीती आहे.

बनावट ॲपच्या माध्यमातून मजुरांची हजेरी

शासनाने आता रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांची ऑनलाइन हजेरी घेण्यासाठीएन एमएमएस नावाचे अॅप तयार करण्यात आलेले आहे. परंतु अशाच प्रकारचे बनावट अॅप तयार करून रोजगार सेवकांशी संपर्क साधून त्यातून हजेरी भरण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार हमीचा धारूर तालुक्यात गोंधळ सुरू असून यंत्राने काम करण्याला वेग आला आहे.

बनावट हजेरी घेण्याचे आमच्याकडे तीन ते चार हजार प्रकरणे आली होती. एनएमएमएस नावाचे अॅप शासनाचे आहे. परंतु काही लोकांनी डुप्लिकेट तयार केलेले आहे. यातून हजेरी घेतली असती आम्हाला ओळखू येते ती आम्ही वेळीच रद्द करण्याचे काम करीत आहोत, आतापर्यंत तीन ते चार हजार या रद्द करण्यात आलेले आहेत.
- शेषेराव कांदे, गटविकास अधिकारी पंचायत समिती धारूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.