

Bogus doctor running a clinic in the middle of a busy square caught
बीड, पुढारी वृत्तसेवा: बीड शहरातील शिवाजीनगर परिसरात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर करून औषधांची विक्री केल्याप्रकरणी एका बोगस डॉक्टरविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा गैरप्रकार सुरु होता.
संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सालय येथे ऋषिकेश दत्तात्रय कानडे हे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र वापरून उपचार करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक प्रमाणपत्र आणि वैद्यकीय शिक्षणाच्या पदवीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित व्यक्त्तीकडे आवश्यक प्रमाणपत्र नसल्याचे आणि बनावट प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाशी संबंधित अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, महसूल प्रशासन आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
यावेळी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, डॉ. प्रितम लोध, अन्न औषध प्रशासनाचे माधव निमसे, एपीय जनाबाई सांगळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पोोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी औधांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या औषधांच्या बाटल्यांचा समावेश आहे.
याशिवाय पावडरच्या पुड्यांचे पॅकिंग साहित्यही आढळल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 336(2), 340 (2) तसेच वैद्यकीय व्यवसायी अधिनियम 1961 मधील कलम 33(1), 33(2) आणि 36 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 29 ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अब्दुलखय्यूम प्रमाणपत्र वापरत असल्याचे समोर आले. या करीत आहेत.
फॉर्च्यूनरमधून प्रवास; हातात अंगठ्या !
बोगस पदवीच्या आधारे रुग्ण तपासणी करणाऱ्या ऋषीकेष कानडे हा रुग्णांची लूट करून, त्याच्या आरोग्याशी खेळ करून कमावलेल्या पैशातून फॉच्युनरमधून फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हातामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठ्या विशेषत चर्चेत असायच्या. आता त्याच्या घरातून चक्क गोळ्या तयार करण्याची मशीनही जप्त करण्यात आली असून रुग्णांच्या आलेल्या पैशाची मोजणी करण्याकरिता असलेली मशीन देखील जप्त करण्यात आली आहे.
आलिशान दवाखाना; रुग्णांची लूट
बोगस डॉक्टर असलेल्या ऋषीकेश कानडे याने तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची अक्षरशः लूट केली. तपासणीसाठी आलेल्या रुग्णाची किमान वीस हजार रुपयांची पॅथॉलॉजी तपासणी केली जात होती. त्यानंतर पंधरा ते वीस हजारांची औषधे या रुग्णाच्या माथी मारली जायची. या व्यवसायात आमची तिसरी पिढी असल्याचे हा कानडे सांगायचा. त्याच्या या भुलथापांना बीडसह शेजारच्या जिल्ह्यातील रुग्ण भुलल्याचे आता समोर येत आहे.