अजित पवारांची उद्या माजलगावात सभा; आयोजक कंत्राटदाराकडून वीजचोरी

आयोजकांकडून नियोजनामध्ये चुक
Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार File Photo
Published on
Updated on

माजलगाव : संपुर्ण राज्यभर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरु आहे. मंगळवारी (दि.1) ही जन सन्मान यात्रा माजलगाव येथे येऊन त्याचा समारोप होणार आहे. मात्र, या ठिकाणी आयोजक कत्राटदाराकडून कार्यक्रमस्थळी वीजचोरी करण्यात आलेली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

Ajit Pawar
आम्ही गोट्या खेळायला गेलो नाही : अजित पवार

माजळगाव येथील मंगलनाथ मैदानामध्ये या यात्रेनिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभास्थळी मागील चार दिवसापासून भव्य अशा मंडपाची उभारणीचे काम सुरू आहे. तेव्हापासून जवळच असलेल्या एका रोहीञावरून डायरेक्ट आकडे टाकून विजेचा वापर सुरू आहे. यासाठी संबंधित मंडप उभारणी वाल्यांनी वीज वितरण कंपनीकडून यासाठी कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सोमवारी (दि.30) संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे आकडे तसेच दिसून येत होते. तीन दिवसांपूर्वी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन विचारणा केली असता आम्ही जनरेटर लावून असल्याचे सांगितले होते. परंतु 3-4 दिवसांपासून या ठिकाणी आकडे टाकून विच चोरी करण्यात येत आहे.

शहरात होणारे जनसन्मान यात्रेसाठी वीज वितरण कंपनीकडून तात्पुरत्या मीटरसाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. दोन दिवसापूर्वी आम्ही जाऊन पाहणी केली होती. यावेळी डीपी वरून फक्त फोकससाठी लाईट घेण्यात आली होती. कार्यक्रमावेळी जनरेटर चा वापर करणार असल्याचे या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते.
कल्पना सांगोलकर , कनिष्ठ अभियंता, विज वितरण कंपनी माजलगाव शहर
Ajit Pawar
शेतीला पुढील ५ वर्षे मोफत वीज देणार : अजित पवार
कार्यक्रम स्थळी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने काय केले याबाबत आम्हाला कोणतीच कल्पना नाही.
जयदत्त नरवडे ,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news