Beed News : लेकीला न्याय मिळण्यासाठी बीडकर रस्त्यावर

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कँडल मार्च
Beed News
Beed News : लेकीला न्याय मिळण्यासाठी बीडकर रस्त्यावर File Photo
Published on
Updated on

Doctor girl ends life case Candle March in Beed

बीड, पुढारी वृत्तसेवा: फलटण येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी बीडकरांच्या वतीने करण्यात आली. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कँडल मार्च काढत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

Beed News
Beed News : वडवणीत आज बंद, रास्ता रोको आंदोलनाची हाक

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉक्टर तरुणी गेल्या काही महिन्यांपासून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती. तिच्यावर वरिष्ठांकडून वेगवेगळ्या कारणातून दबाव आणला जात होता. तसेच पोलिस अधिकारी देखील तिला धमकावत होते. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोटमध्ये पोलिस अधिकारी गोपाल बदने व बनकर यांनी माझा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे लिहीले होते.

या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बीडकर रस्त्यावर उतरले. सोमवारी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या कँडल मार्चला प्रारंभ झाला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मार्च गेल्यानंतर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Beed News
Beed News : औश्यात शेतकऱ्याने पेटवून घेतले, उपचारादरम्यान मृत्यू

डॉक्टर्स संघटनेचाही सहभाग

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी बीड शहरातून काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये डॉक्टर्सच्या विविध संघटनांनी सहभाग घेतला. शहरातील डॉक्टर्स देखील या कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news