Beed Crime News : बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

अंबाजोगाई येथील न्यायालयाने कासले यास २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Beed Crime News
Beed Crime News : बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेला दोन दिवसांची पोलिस कोठडीFile Photo
Published on
Updated on

Dismissed police officer Ranjit Kasle sent to two-day police custody

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा

बीडचे बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले यांस काल अंबाजोगाई पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने मुंबई येथील जेल मधून ताब्यात घेऊन येथे आणल्यानंतर आज दि ४ रोजी न्यायलयात हजर केले असताना अंबाजोगाई येथील न्यायालयाने कासले यास २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Beed Crime News
Beed News | विविध मागण्यांसाठी केज तहसील कार्यालयासमोर नागरिकांची उपोषणे

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या महाराष्ट्राच्या वर्तुळात चर्चेत असलेले नाव म्हणजे बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले. रणजित कासले याला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली होती. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाणे, आंबजोगाई शहर पोलिस स्टेशन आणि सायबर विभागात त्याच्याविरोधात रविवारी आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मुंबईतही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात रणजीत कासलेला अटक करण्यात आली. दरम्यान, पोलीस त्याला कोर्टाबाहेर घेऊन जाताना कासलेने सरकार विरोधात घोषणाबाजी केली. बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते.

तर, निवडणुकीत ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी आपल्या खात्यावर धनंजय मुंडे यांच्या माणसाकडून १० लाख रुपये टाकल्याचा दावाही त्याने केला होता. काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नेत्यांवर गंभीर आरोप करत विविध दावे केले, ज्यामुळे एकच खळबळ माजली होती. याच सर्व प्रकरणांमुळे राज्यातील विविध भागांमध्ये कासले याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्या विर ोधात बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अधाव यांच्या तक्रारीवरुन सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी, तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हा नोंद आहे.

Beed Crime News
Beed Crime : बीडमधील साठे चौकात दोन गटात हाणामारी

अन्य गुन्हात राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मीडियातून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी ही तक्रार दिली असून या दोन्ही बाबीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड, परळी, अंबाजोगाई यासह मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात लेले आहेत. काही दिवसांपूर्वीच रणजित कासलेला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर कासलेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आरोप केले होते.

बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला रविवारी पोलिसांनी दिल्ली येथे अटक केल्या नंतर सोमवारी मुंबईतील किल्ला कोर्टात हजार करण्यात आले न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असताना, अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनला रंजीत आकासले याचेविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत व अंबाजोगाईचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवार पोलीस कॉन्स्टेबल चादर, पोलिस कॉन्स्टेबल भागवत नागरगोजे, वाहन चालक ए एस आय शिदे या पथकाने न्यायालयाच्या परवानगीने काल दुपारी कासले याला मुंबई येथून ताब्यात घेऊन अंबाजोगाई येथे आणून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्या. अश्विनी ढवळे यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने कासले यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकार पक्षातर्फे अॅड. गिरी तर आरोपी पक्षातर्फे ॲड. नवनाथ साखरे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news