

Beed Kej Tehsil office Protest
केज : केज तालुक्यातील विविध मागण्या संदर्भात केज तहसील कार्यालयासमोर आज (दि.५) दोन उपोषणे सुरू आहेत.
केज तालुक्यातील देवगाव येथील देवगाव ते रेणुकामाता मंदिर रस्त्याचे काम अंदाज पत्रका नुसार न करता निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या कामाची गुण नियंत्रका मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालयासमोर कामाची चौकशी करण्यात यावी. या मागणीसाठी कैलास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलेले आहे.
तर दुसरे उपोषण हे केज- कळंब या महामार्ग क्रमांक ५४८- सी या रस्त्या लगत नाली बांधकाम न केल्यामुळे रस्त्याला लगत राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून जात असल्याने नाली बांधकाम करावे. या मागणीसाठी सतीश बनसोडे, अविनाश बनसोडे, अलका सरवदे, राजाभाऊ बचुते यांच्यासह रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.