

परळी : माझे वडील पंडितअण्णा गेल्यानंतर अजितदादांनी मला कधीच वडिलांची उणीव भासू दिली नाही. प्रत्येक कठीण काळात ते माझ्या पाठीशी आधारवड म्हणून उभे राहिले. आज ते गेल्याने मी आणि महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दांत आमदार धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना भावुक श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या भावना व्यक्त करताना मुंडे म्हणाले की, राज्यात घडामोडी असताना टीव्हीवर अजितदादा नॉट रिचेबल अशी बातमी यायची, पण माझ्यासाठी ते नेहमीच रिचेबल असायचे. मात्र, दुर्दैवाने आज दादा माझ्यापासून आणि महाराष्ट्रापासून कायमचे नॉट रिचेबल झाले आहेत. हे दुःख पचवण्याइतके माझे मन सक्षम नाही.
गोपीनाथ मुंडे , विनायक मेटे आणि आता अजितदादा... आमचा बीड जिल्हा शापित आहे की काय, असा प्रश्न पडतो, असे म्हणत मुंडे यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या.