Beed Crime News : जुगाराला विरोध केल्याच्या रागातून महिलेला मारहाण

रंजेगाव हादरले; महिलेला अमानुष मारहाण, दोन चिमुकल्यांनाही फेकल्याचा आरोप
Beed Crime News
Beed Crime Newspudhari photo
Published on
Updated on

बीड : बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे गावातील जुगाराच्या अड्ड्याला विरोध करणाऱ्या एका दलित महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी निखिल आबूज याच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Beed Crime News
Uttan Slaughterhouse Reservation: उत्तनमध्ये कत्तलखान्याचे आरक्षण रद्द होणार? घनकचरा प्रकल्पानंतर नागरिकांचा तीव्र संताप

पीडित महिलेने गावात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यामुळे शाळकरी मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याची भूमिका घेत त्याला विरोध केला होता. तसेच तिच्या घरासमोर वारंवार लघुशंका करणाऱ्या आरोपींबाबतही तिने आक्षेप नोंदवला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी महिलेला लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहितीनुसार, आरोपी निखिल आबूज व त्याच्या साथीदारांनी संबंधित महिलेला घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

यावेळी तिच्या दोन लहान मुलांनाही जमिनीवर फेकून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसू नयेत म्हणून आरोपींनी महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण केल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे.

Beed Crime News
Nanded gangwar | नांदेडात गँगवॉर; 3 ठार

या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत निखिल आबूजसह सहा आरोपींना अटक केली. आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

रंजेगावातील या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून गावातील गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकीय संरक्षण मिळत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. जुगाराला विरोध करणाऱ्या महिलेवर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे जिल्हाभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकरणी पिंपळनेर पोलिस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल : निखील गोविंद आबुज , रामा कोटुळे, बबलू गंगाराम आबुज , पवन संतोष तायड, प्रशांत शंभू तायड, रामू लक्ष्मण आबुज राहणार सर्व रंजेगाव तालुका बीड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news