MLA Namita Mundada : पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करा :

कमी पाऊस आणि पावसातील खंडामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत.
MLA Namita Mundada
MLA Namita Mundada : पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करा : file photo
Published on: 
Updated on: 

Complete crop damage assessments on time: MLA Namita Mundada

केज, पुढारी वृत्तसेवा कमी पाऊस आणि पावसातील खंडामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत. पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देतानाच पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे राबवावेत, अशा सूचना आमदार नमिता मुंदडा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

MLA Namita Mundada
Beed News : शिवसंग्राम, भाजपा सोडलेले मस्के राष्ट्रवादीतही नाराज ?

केज तहसील कार्यालयात बुधवारी दुष्काळी परिस्थिती, संभाव्य पाणीटंचाई, पीक नुकसान, पीकविमा, चारा व रोजगाराच्या प्रश्नांबाबत केज व बीड तालुक्यांची आढावा बैठक झाली. यावेळी अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, बीडचे तहसीलदार शेळके, केजचे नायब तहसीलदार अशोक भंडारे, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, गरजेनुसार टँकरची व्यवस्था, जनावरांसाठी चारा व पाण्याची सुविधा आणि रोजगाराच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना आ. मुंदडा यांनी दिल्या. आढावा बैठक केवळ कागदोपत्री न राहता निर्णयांची कालबद्ध व प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा जपावा, अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवावे, उपलब्ध पाणीस्रोतांची माहिती संकलित करावी, मनरेगाची कामे सुरू करण्यासाठी नियोजन करावे, तसेच चारा बाहेर जाणार नाही यासाठी चारा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निर्देश देण्यात आले. पीक कापणी प्रयोगांसाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची सूचना विमा कंपनीला करण्यात आली. बैठकीस भाजपचे पदाधिकारी, सरपंच, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

MLA Namita Mundada
Mandai-cha Raja : लालबागच्या राजाच्या धर्तीवर साकारतोय 'मंडईचा राजा'!

ऊस, फळबागांच्या नुकसानीचीही पाहणी करा

उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी सर्व पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश दिले. ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले असून फळबागाही जळाल्या आहेत. त्यामुळे केवळ सोयाबीनपुरती पाहणी न करता ऊस व फळबागांसह सर्व पिकांचे पंचनामे करावेत, असे सांगण्यात आले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे पीक कापणी प्रयोग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news